farmer esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पथारे (ता. शिंदखेडा) येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. (farmer in Shindkheda taluka committed suicide dhule news)

पावसाअभावी, अवकाळी पावसामुळे पिकांची स्थिती चांगली नसल्याने तसेच शेतात केलेल्या कूपनलिकेला चांगले पाणी लागले नसल्याने हताश झालेले शेतकरी हेमराज भटेसिंग गिरासे (वय ४७) यांनी गुरुवारी (ता.३०) सकाळी साडेअकराच्या सुमारास निमगूळ रस्त्यावरील खळ्यात विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली.

याची माहिती त्यांचे लहान भाऊ विरपाल गिरासे (खर्दे ता. शिंदखेडा) यांना मिळाली. त्यांनी नातेवाइकांसह ग्रामस्थांच्या मदतीने खासगी वाहनातून दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात भटेसिंग गिरासे यांना दाखल केले.

डॉ. तेजस जैन यांनी तपासून दुपारी साडेबाराला मृत घोषित केले. त्यांनी विविध बँकांतून कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली असल्याची फिर्याद वीरपाल गिरासे यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई गावित तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT