premsingh Girase dead farmer esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : डोंगरगावच्या शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : डोंगरगाव (ता. शहादा) येथील शेतकरी प्रेमसिंग रतनसिंग गिरासे (वय ५७) यांनी रामी-पथारे शिवारात धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली आहे.

कर्जबाजारी व नापिकीमुळे त्यांनी जीवन संपविल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी (ता. १७) सकाळी ही घटना घडली असून, त्याबाबत हळहळ व्यक्त होत आहे. (farmer of Dongargaon committed suicide under train dhule news)

रामी-पथारे (ता. शिंदखेडा) शिवारात दोंडाईचापासून काही किलोमीटरवर रेल्वेरुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती दोंडाईचा पोलिसांना मिळाल्याने त्यांनी धाव घेतली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. तपासाअंती तो डोंगरगाव येथील प्रेमसिंग रतनसिंग गिरासे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रेमसिंग गिरासे हे शेतीवरच उदरनिर्वाह करीत होते. मात्र काही वर्षांपासून निसर्गाची साथ मिळत नसल्याने ते कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते. वेळेत कर्जाची परतफेड करता न आल्याने त्यांच्याकडे तगादा सुरू होता. त्यातून ते खचून गेले होते.

त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच डोंगरगाव येथील नातेवाईक दोंडाईचा येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. दोंडाईचा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT