During the discussion with the superintendent engineer of the power company, Gangadhar Mali neighbor Prof. Sharad Patil and delegation. esakal
उत्तर महाराष्ट्र

Farmer Protest : भारनियमनप्रश्‍नी शेतकऱ्यांचा अभियंत्यास घेराव; 2 तासाच्या आंदोलनानंतर तीन मागण्या मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Farmer Protest : भारनियमनप्रश्‍नी शेतकऱ्यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी दोन तास वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना सोमवारी (ता. ४) घेराव घातला. दुहेरी भारनियमनाची जाचक अट शिथील करण्यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या. त्यानंतर शेतकऱ्यांच्या तीन मागण्या तत्काळ मंजूर झाल्या.

उर्वरित मागण्यांबाबत शासनदरबारी प्रस्ताव पाठविण्याचे ठरले. दोन आठवड्यांआत सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक गंगाधर माळी यांनी दिला. (farmer protest in front of Superintending Engineer of Electricity Company in dhule news)

शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, श्री. माळी, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, बाबाजी पाटील, आनंदा बडगुजर, राजेंद्र माळी, प्रभाकर चौधरी, विलास चौधरी, संतोष खैरनार, गजानन आधार, मोहन सूर्यवंशी, दिलीप माळी, महेंद्र खैरनार, अशोक महाले, संजय माळी, दीपक बडगुजर, रोहिदास माळी, अनिल पाटील, चंद्रशेखर पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांबाबत एक आठवडा दिवसा, तर एक आठवडा रात्री, अशी भारनियमनाची जाचक अट आहे. राज्य शासनाने बारा तासांच्या भारनियमनाव्यतिरिक्त मर्जीप्रमाणे दुहेरी भारनियमनाची अट लादली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुष्काळीस्थितीत थकीत बिले वसुलीसाठी वीज कंपनी तगादा लावत आहे. यासंदर्भात घेरावकर्त्यांनी केलेल्या मागण्यांप्रमाणे डिसेंबर २०२३ पर्यंत वीज महावितरण कंपनी शेतकऱ्यांकडून थकीत बिले वसुलीसाठी तगादा लावणार नाही.

शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकरी व शेतमजूरांना सिंगल फेज लाईन उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती पावले तत्काळ उचलली जातील. शेतातील डिपी अथवा वीज वितरणाच्या लाईन नादुरुस्त असतील तर ते दुरूस्तीसाठी कंपनीकडून वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार केले जाईल.

पथकातील समन्वयक २४ तास संपर्कात राहिल, असे ठरले. शेतकऱ्यांसाठी किमान दिवसा दहा तास वीज उपलब्धतेसाठी प्रस्ताव पाठविला जाईल, अशी हमी अधीक्षक अभियंत्यांनी आंदोलकांसमोर दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Stock Market Today : जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; सोनं मात्र तेजीत; कोणत्या शेअर्सला फटका?

T20 World Cup : बांगलादेशची ICC कडून कोंडी! देश नव्हे, फक्त शहर बदलण्याचा ठेवला प्रस्ताव; हेही मान्य न केल्यास...

Bigg Boss विजेता शिव ठाकरे अडकला विवाहबंधनात, गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर लग्नातले फोटो व्हायरल

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SCROLL FOR NEXT