fog on onion crop.jpg 
उत्तर महाराष्ट्र

VIDEO : कांदा पिकावर धुक्याची चादर...शेतकऱ्यांना 'या' कारणाने धास्ती.

बापूसाहेब वाघ : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अवकाळी पावसाने कांद्याचे घटलेले उत्पादन व वाढती मागणी  यामुळे कांद्याला अपेक्षेपेक्षा जास्त भाव मिळत असल्याने अनेक वर्षानंतर असंख्य शेतकऱ्यांसाठी कांदा पिकामुळे सुगीचे दिवस पाहावयास मिळत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांजवळ कांदा आहे त्यांना किमान लाखाच्या पुढे पैसे होत आहे.परंतु सध्याचे ढगाळ वातावरण बघता जोमात आलेले कांदा पिकाची काळजी घेण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. त्यात बुधवार (ता.१८) मुखेड,जळगाव नेऊर व परिसरात आलेल्या दाट धुक्यामुळे कांदा पिकावर एकप्रकारे धुक्याची चादर पसरली होती. त्यामुळे जोमात आलेल्या कांदा पिक कोमात जाण्याची धास्ती शेतकऱ्यांना वाटत आहे. 

जोमात आलेले कांदा पिक कोमात जाण्याची धास्ती?

कांदा भाववाढीने कांदा उत्पादक क्षेत्रात वाढ - कांद्याला विक्रमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी कांदा पिक लागवडीसाठी सरसावले असुन त्यामुळे कांद्याच्या रोपाला हजारो रूपये खर्च करूनही रोप मिळत नाही अशी वस्तुस्थिती आहे. कांदा रोप मिळावे यासाठी शेतकरी बाहेरगावी असलेले पाहुणेमंडळी बरोबर परजिल्ह्यातही ठिकठिकाणी भटकंती करत आहेत. एकवेळ मातीमोल मिळणारे कांदा रोप एका कॅरेटसाठी हजार ते दोन हजार रूपये मोजावे लागत आहे.

सर्वच पिकांसाठी धुके धोकादायक

धुक्यामुळे कांदा पिकाची पात वरच्या टोकापासून पिवळी पडण्यास सुरूवात होवून करपा येतो. परिणामी ज्या कांदा पिकाची पात चांगली असते त्याची वाढ चांगली होते. कांदा पात पिवळी पडल्यास कांद्याची वाढ होत नाही. सर्वच पिकांसाठी धुके धोकादायक असते.औषध फवारणी करून कांदा पिक वाचवण्याचा प्रयत्न करू.- रामनाथ सांगळे,कांदा उत्पादक शेतकरी मुखेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: खार स्टेशनजवळ दोन इसम चालत्या ट्रेनमधून पडले

Leopard Caught : नागापूर येथे एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

SCROLL FOR NEXT