Farmers get package worth 18 lakhs In Campus Interview dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Success Story : शेतकरीपुत्रांना मिळाले 18 लाखांचे पॅकेज..! NMIMSमधून घेतली भरारी...

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : येथील एसव्हीकेएम संचलित एनएमआयएमएस (NMIMS) अभिमत विद्यापीठातील बी.टेक.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या संदीप रामदास वाघ व सागर रवींद्र बीडकर यांना लुधियाना येथील ट्रायडेंट लिमिटेड कंपनीतर्फे झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये वार्षिक १८ लाख रुपयांचे पॅकेज देऊन नियुक्ती देण्यात आली. (Farmers get package worth 18 lakhs In Campus Interview dhule news)

दोघेही शेतकरी कुटुंबातील सदस्य आहेत. येथील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आतापर्यंत मिळालेले हे सर्वोच्च पॅकेज आहे. ट्रायडेंटतर्फे समूहचर्चा व वैयक्तिक मुलाखत अशा द्विस्तरीय पद्धतीने मुलाखतींची प्रक्रिया पार पडली. त्यात संदीप वाघ व सागर बीडकर यांना नियुक्ती देण्यात आली.

निवड प्रक्रियेपूर्वी ट्रायडेंटचे मानव संसाधन विभागप्रमुख अमित जैन, उत्पादन विभागाचे महाव्यवस्थापक अमित घोषाल यांनी कंपनीबाबत माहिती दिली. संदीप वाघ व सागर बीडकर यांनी एनएमआयएमएसच्या शिरपूर कॅम्पसमध्ये व्यापक शिक्षणाचा अनुभव घेतला असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकपूर्ण शिक्षण घेतले आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

त्यांच्या नियुक्तीचे एसव्हीकेएम संस्थेचे अध्यक्ष व एनएमआयएमएस अभिमत विद्यापीठाचे कुलपती आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतन पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, शिरपूर कॅम्पसचे संचालक डॉ. अक्षय मल्होत्रा, मुख्य लेखापाल व प्रशासक राहुल दंदे, कॅम्पस को-ऑर्डिनेटर प्रसन्न ओझा यांनी स्वागत केले.

"ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेल्या युवकांना संधी लाभावी म्हणून शिरपूरमध्ये सप्ततारांकित शैक्षणिक संकुलाची उभारणी केली. त्याची ध्येयपूर्ती बघून समाधान वाटते. येथून जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता असलेले विद्यार्थी घडावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत." -अमरिशभाई पटेल, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar Beef Seized: 'जुन्नरला चार गाई व दोन टन गोमांस जप्त'; जुन्नर पोलिसांची धडक कारवाई

Latest Marathi News Live Update: 'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT