Murder sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : बापाने केला मुलाचा खून

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : बसरावळ (ता.साक्री) येथे बापाने रागाच्या भरात २८ वर्षीय मुलाचा लाकडी थापीने खून केला. (Dhule News) संशयित बाप रामा कुवर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(father killed son in sakri dhule crime news)

बसरावळ (ता.साक्री) शिवारात निमा रामा कुवर यांच्या शेतातील राहते घराचे अंगणात सोमवारी (ता.२४) रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान मुलगा ईलमजी रामा कुवर (वय २८) हा नेहमी प्रमाणे दारू पिऊन वडील रामा धुळ्या कुवर यांना तो नेहमी प्रमाणे तुम्ही माझ्यासाठी काय कमवून ठेवले आहे.

तुम्ही मला काय दिले, असे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होता. या कारणावरून वडील रामा कुवर यांनी मुलगा ईलमजी यास जवळच पडलेल्या लाकडी थापीने (धुपाटणे) दोन्ही हातांवर, डाव्या डोळ्यावर, डाव्या कानावर, डोक्यावर मारहाण केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यात त्यास गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. आई निमा कुवर यांच्या फिर्यादीवरून रामा धुळ्या कुवर यांना पिंपळनेर पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT