Forest staff performing cremation on a leopard. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Leopard News : अज्ञात वाहनाच्या धडकेने मादी बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Leopard News : तळोदा तालुक्यातील खेडले-धानोरा रस्त्यावर शनिवारी (ता. २) सकाळी सातच्या सुमारास तीनवर्षीय मादी बिबट्या मृत्युमुखी पडलेला नागरिकांना दिसला. अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

मृत बिबटचे विच्छेदन करून त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले असून, या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.(female leopard died after being hit by unidentified vehicle nandurbar Leopard news )

तळोदा वनक्षेत्रातील राणीपूर परिमंडळातील धनपूर नियत क्षेत्रात मौजे खेडले गावाजवळ खेडले-धानोरा रस्त्यावर शनिवारी (ता. २) सकाळी सातच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळला. रस्त्यावर मृत बिबट्याला पाहून रस्त्यावरून येणारे-जाणारे नागरिक त्या ठिकाणी थांबून मृत बिबट्याचे छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये कैद करीत होते.

त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. काही सुज्ञ नागरिकांनी याबाबतची माहिती तळोदा वन विभागाला कळविली. घटनेची माहिती मिळताच तळोदा वन विभागाचे उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील, वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, वनपाल भारती सयाईस, वनपाल वासुदेव माळी, वनरक्षक राहुल कोकणी, वनरक्षक वीरसिंग पावरा, वनरक्षक गिरधन पावरा, वनरक्षक जान्या पाडवी यांच्या पथकाने घटनास्थळी त्वरित भेट दिली.

दरम्यान, मृत बिबट्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय मोलके यांनी केले असता तो तीनवर्षीय मादी असल्याचे निदर्शनास आले. तसेच अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचे डोके व जबड्याला मार लागून रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

त्याचे दात, चारही पायांचे पंजे, नखे व कातडी असे सर्व सुस्थितीत असल्याचे दिसले. बिबट्यावर जाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, राणीपूरचे वनपाल तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा लालबाग परिसरातून पुन्हा लालबाग गेटजवळ आला

India's All-Time T20I XI : रोहित, विराट, सूर्या संघात; कर्णधार मात्र वेगळाच, आशिया चषकापूर्वी पाहा भारताचा ऑल टाईम ट्वेंटी-२० संघ

MiG-21 retirement: तब्बल सहा दशकांहून अधिक काळ देशाचे रक्षण केल्यानंतर आता ‘मिग-21’ निरोप घेणार

Mumbai Water Level: वर्षभराची चिंता मिटली! गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील धरणे फुल्ल; आकडेवारी आली समोर

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ कुरळे ब्रदर्स घेऊन येताहेत हास्याचा डबल धमाका! 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा

SCROLL FOR NEXT