
Nandurbar Leopard News : रांझणी (ता. तळोदा) परिसरात दिवसाढवळ्या बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, वाहनधारक, मजूर भयभीत झाले आहेत. मंगळवारी (ता. १) दोन युवकांना दिवसाढवळ्या एकाच वेळी तीन बिबट्यांनी दर्शन दिल्याची घटना घडली.
त्यामुळे संबंधित विभाग काही अप्रिय घटना घडण्याची वाट बघत आहे का, असा प्रश्न निर्माण होत असून, संबंधित विभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. (3 leopards at same time seen in taloda nandurbar news)
रांझणी-गोपाळपूर रस्त्यावर सागर गोसावी व सागर सोजळ हे दोन युवक पावसाने उघडीप दिल्याने शेतशिवारात पीक पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यापासून काही अंतरावरच तीन बिबटे सोबत चालत असल्याचे दिसून आल्याने त्यांची एकच भंबेरी उडाली. त्यांनी तेथून काढता पाय घेतला व गावात आपल्या मित्रांना भ्रमणध्वनीद्वारे ही माहिती कळविली.
पण तोपर्यंत बिबटे तिथून पसार झाले होते. त्यातच दोन दिवसांपूर्वीच रांझणी येथील ग्रामपंचायत सदस्य धनराज कदम व विजय ठाकरे आपल्या मोटारसायकलने तळोद्याहून रांझणीला येत असताना रांझणी फाट्याजवळ रस्त्यालगतच दोन बिबट्यांचे त्यांना दर्शन झाले होते. त्यामुळे दिवसाढवळ्या बिबटे दिसू लागल्याने भीती वाढली असून, संबंधित विभागाने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या परिसरात पावसाने काहीशी उघडीप दिल्याने निंदणी, फवारणी, खते देणे या कामांना वेग येणार असला तरी बिबट्यांचा खुलेआम वावर वाढल्याने मजूरवर्ग धास्तावला असून, केळी, पपई, ऊस, कापूस यांसारख्या पिकांच्या आजूबाजूस कामे करण्यास त्यांच्याकडून नकार देण्यात येत असल्याचेही बोलले जात आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, दोन, तीन बिबटे सोबतच फिरत असल्याने त्यांच्यामध्ये सावजावरून जोरदार झुंज झाल्यास ते मृत्युमुखी पडू शकतात, असेदेखील बोलले जात आहे. गेल्या वर्षी रांझणी गावाजवळ दोन बिबट्यांच्या झुंजीत एक बिबट्या मृत्युमुखी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबतही संबंधित विभागाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. तसेच या वनपरिक्षेत्रात बिबट्यांचे संख्या किती हाही एक प्रश्न असून, दहापेक्षा अधिक बिबटे या क्षेत्रात असू शकतात, असेही जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.
भरपाई मागावी कुणाकडे?
परिसरात शेळ्यांसह इतर प्राणी शोध घेऊनही मिळून येत नसल्याने पशुमालकांना ते बिबट्याचे बळी ठरले असे लक्षात येत असले तरी त्यांच्याकडे बिबट्याने मृत्युमुखी पाडल्याच्या कुठलाही ठोस पुरावा नसल्याने संबंधित शेतकरी, शेतमजूर नुकसानभरपाईपासून वंचित राहत असून, बहुतांश जणांना याचा फटका बसत आहे. भरपाई मागावी कुणाकडे, असा प्रश्न संबंधितांना पडत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.