Firefighters and vehicles trying to put out the fire esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नवापुर बाजारपेठेत आग लागली; अग्निशामक दलाने मिळविले नियंत्रण

सकाळ वृत्तसेवा

नवापूर : शहरातील लाइट बाजार भागात शुक्रवारी (ता. ६) दुपारी साडेबाराच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरील राहत्या घराला आग लागली. यात लाकडी सामान व इलेक्ट्रॉनिक वस्तू खाक झाल्या. आगीची माहिती मिळताच बाजारपेठेतील व्यापारी बांधवांनी तत्काळ धावपळ करून मिळेल त्या साधनाने आगीवर पाणी टाकण्याचा प्रयत्न केला.

पालिकेचे अग्निशामक वाहन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. गॅस गिझर व बॅटरी इन्व्हर्टरमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

नवापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत लाइट बाजार म्हणून असलेल्या परिसरात शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कापड व्यापारी राजेंद्र नागरमल अग्रवाल यांच्या राहत्या घरातील तिसऱ्या मजल्यावर आग लागली. आगीत लाकडी फर्निचर, सामान, कूलर, इन्व्हर्टर बॅटरी, गॅस गिझर आदी इलेक्ट्रॉनिक साहित्याने क्षणात रौद्ररूप धारण केले. (Fire breaks out in Navapur market Firefighters gained control Nandurbar News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

आग लागल्याची घटना कळताच लाइट बाजारपेठेतील व्यापारी बांधवांनी तत्काळ धावपळ करून मिळेल त्या साधनाने आगीवर पाणी टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीचे रौद्र रूप पाहता पालिकेच्या अग्निशामक वाहनास प्रचारण करण्यात आले. अग्रिशामक दलाने तत्काळ घटनास्थळी येऊन पाण्याचा मारा केल्यामुळे आग आटोक्यात आली.

यामुळे मोठा अनर्थ टळला. यात मालमत्तांचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ, उपनिरीक्षक अशोक मोकळ, जगदीश सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. या भागात मोठ्या प्रमाणावर दुकानदारांनी दुकानाच्या ओट्यावर अतिक्रमण केल्याने वाहन घुसण्यासाठी जागाच राहत नाही. झालेली गर्दी दूर करत पोलिसांनी अग्निशामक वाहनाला मार्ग मोकळा करून दिला.

या वेळी पालिका प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, सतीश बागूल, आनंद साळवे, सलीम पठाण यांनी तत्काळ आग विझविण्यासाठी मदत केली. नवापूर शहरातील लाइट बाजार हा शहराचा मध्यभागी असल्यामुळे नागरिकांनी गर्दी केली होती. आगीचे कारण इन्व्हर्टर बॅटरी व गॅस गिझरने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या वेळी महसूल विभागाचे तलाठी घटनास्थळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT