Tehsildar Girish Wakhare, Principal Vikram Jagdale, Construction Engineer Ganesh Gavit were present during the auction process. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : तळोद्यात गाळ्यांच्या लिलावात कोटीचे उड्डाण! 82 दुकानांच्या लिलावातून मिळाले 1 कोटी 4 लाख 27 हजार

तब्बल बारा वर्षांपासून रखडलेली लिलावप्रक्रिया पार पडल्याने व्यापाऱ्यांसह शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे

सकाळ वृत्तसेवा

तळोदा : पालिकेच्या १४६ व्यापारी गाळ्यांसाठी मंगळवारी लिलावप्रक्रिया घेण्यात आली. या लिलावात ८२ दुकानांचा लिलाव झाला असून, त्यातून पालिकेला एक कोटी चार लाख २७ हजारांचा महसूल मिळाला आहे.

त्यामुळे तब्बल बारा वर्षांपासून रखडलेली लिलावप्रक्रिया पार पडल्याने व्यापाऱ्यांसह शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. (flight of 1 crore 4 lakh 27 thousand received from auction of 82 shop Nandurbar News)

ही लिलावप्रक्रिया तहसीलदार गिरीश वखारे, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, प्रशासन अधिकारी दीपक पाटील, बांधकाम अभियंता गणेश गावित यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी अकरापासून पालिका आवारात घेण्यात आली.

या वेळी १४६ दुकानांसाठी ११९ व्यापाऱ्यांनी पालिकेची लिलाव फी भरून टोकण घेतले होते. त्यातून तळमजल्यावरील ७३ दुकानांचा लिलाव झाला असून, त्यातील सात दुकाने दिव्यांगांना देण्यात आलेली आहेत.

वरच्या मजल्यावरीलही ७३ दुकानांपैकी केवळ नऊ दुकानांचा लिलाव होऊ शकला आहे. यात दोन्ही मजल्यांवरील एकूण ८२ दुकानांचा लिलाव झाला आहे. पालिकेच्या प्रक्रियेतून एक कोटी चार लाख २७ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.

ही व्यापारी गाळे जुन्या धान्य मार्केटच्या जागेवर २०१२ मध्ये बांधले होते. दोन टप्प्यांत झालेल्या या बांधकामात एकूण १४६ व्यापारी गाळे बांधून तयार झाले होते. मात्र या व्यापारी गाळ्यांचे तांत्रिक कारणांमुळे लिलाव होत नव्हते.

लिलावप्रक्रियेसाठी मिळकत विभागाचे मोहन माळी, घरपट्टी वसुली निरीक्षक राजेंद्र माळी, दिगंबर सूर्यवंशी, अनिल माळी, आरोग्य निरीक्षक अश्विन परदेशी, लेखापाल लखन कड्रे यांनी सहकार्य केले. पालिका आवारात व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

तरुणीच्या सहभागाचे कौतुक

गाळा क्रमांक ४८ ला दोन लाख ६२ हजार रुपयांची बोली मिळाली. ही बोली १९ वर्षीय तरुणी लक्ष्मी पाडवी हिने लावली. त्यात या तरुणीने लिलावात सहभाग घेतल्याने तिचे कौतुक करण्यात येत आहे.

वरच्या मजल्याला नापसंती

व्यापारी गाळ्यांच्या वरच्या मजल्यावरील ७३ दुकानांपैकी केवळ नऊ दुकानांचे लिलाव झाले आहेत.

ज्या दुकानांचे लिलाव झाले नाहीत त्या दुकानांवर कोणाचाही बेकायदा कब्जा होऊ नये म्हणून पालिकेने जागरूक राहावे अन्यथा लिलावात भाग घेतलेल्यांवर अन्याय होऊ शकतो, असे व्यापाऱ्यांनी बोलून दाखविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Protest : मोठी बातमी ! मालेगाव अत्याचार प्रकरणी जनआक्रोश मोर्चाला हिंसक वळण, आक्रमक आंदोलक गेट तोडून कोर्टात घुसले

Donald Trump: साडेतीनशे टक्के शुल्क लावणार होतो; ट्रम्प यांच्याकडून संघर्ष थांबविल्याचा पुनरुच्चार

Google Maps Offline: इंटरनेटशिवाय Google Map कसं वापरायचं? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स अन् ट्रिक

Latest Marathi News Live Update : २००२ च्या तरतुदींनुसार अंदाजे १०८ कोटी रुपये किमतीचा १.३५ एकरचा व्यावसायिक भूखंड तात्पुरता जप्त केला आहे- ईडी

Viral Video Teacher : शाळेतच मुख्याध्यापकाचा इंग्लिश नजराणा! प्रार्थना सुरू असताना कांबळे सर टल्ली होऊन नाचू लागले अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

SCROLL FOR NEXT