-cyber-crime
-cyber-crime 
उत्तर महाराष्ट्र

ओटीपी क्रमांक विचारून चार लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव: दांम्पत्याची पोलिसांत तक्रार;बँकखात्यात परस्पर मारला हात 
महापालिकेत प्रयोगशाळा तंत्रद्न्य व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून "ओटीपी क्रमांक विचारात अज्ञात चोरटयांनी चार लाख रुपयांचा डल्ला मारला.खात्याचे नूतनीकरण करायचे सांगून मोबाईलवर आलेल्या ओटीपी क्रमांकाद्वारे दोन खात्यांमधून ही रक्कम लंपास झाली.या प्रकरणी संबधित दांम्पत्याने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर प्रकरण सायबर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. 
जीवनदास बाजीराव मेश्राम (४२) महापालिकेत प्रयोगशाळा तंत्रद्न्य म्हणून कार्यरत असून त्यांच्या पत्नी वैदकीय सेवेत कार्यरत आहेत. मेश्राम दांम्पत्य शहरातील सोनीनगर सावखेडा परिसरात वास्तव्यास आहेत.जीवनदास मेश्राम याना ६ ते ९ जानेवारी दरम्यान ( ७७२९१५८३६८०व (७४४०१२९०९८)या मोबाइलला नंबरवरून फोन आला.तुमच्या बँकेतून बोलतोय असे सांगत खात्याचे नूतनीकरण करायचे आहे..असे सांगत मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक मागण्यात आला.ओटीपी नंबर दिल्यानंतर जीवनदास मेश्राम याना कामाच्या ओघात विसर पडला. 

"थंडीने केळी गोठवली: चारशेवरुन केवळ ४० ट्रक्स निर्यात
आज बँकेत कामानिमित्त जयश्री मेश्राम यांनी बॅलेन्स तपासल्यावर खात्यातून पैसे विड्रॉल झाल्याचे आढळून आले.घडल्या प्रकाराबाबत बँक स्टेटमेंट तपासून बघितल्यावर पती पत्नीच्या दोन्ही खात्यातून तब्बल पाऊणे चार लाख रुपये( ३ लाख ७८ हजार) लंपास झाल्याचे आढळून आले.घाबरलेल्या अवस्थेतच पती-पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली.सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. 

सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन 
कोणत्याही बँकेचे अधीकारी फोन करून एटीएम कार्डचा नंबर ,ओटीपी मागत नाही.सायबर गुन्हेगारांकडून अशाप्रकारे फोन करून "बँकेतून मॅनेजर बोलतोय" असे सांगत खात्याशी निगडित डिजिटल माहिती घेत खात्यातून रक्कम ऑनलाईन पद्धतीने चोरली जाते.म्हणून कोणालाही बँक खात्याशी संबधित माहिती देऊ नये.तसेच सर्वच बँकांचे खाते हे मोबाइल नम्बरसोबत जोडलेले आहेत.व्यवहार झाल्याबरोबर एसएमएस अपलोड होतो. मोबाईलवर आलेला प्रत्येक एसएमएस किमान वाचून घेणे अपेक्षित आहे खात्यावर नको असलेले व्यवहार झाल्याचे निदर्शनास येताच सर्वात प्रथम बँक खाते ब्लॉक करण्यासाठी बँकेशी संपर्क करावा.नंतर  तात्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन सायबर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

Crime: 'विषारी गोमांस देऊन सासरच्यांना संपवले!' 8 हत्या करून महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT