Leopard News esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : खापर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकुवा जि. नंदुरबार) : अक्कलकुवा तालुक्यातील खापर शहराजवळील ब्राह्मणगाव शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार वाढला असून, श्री महावीर गोशाळा येथील गायीवर बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याची खळबळजनक घटना घडली. गायीसोबत वासरीलादेखील गंभीर जखमी केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Free movement of leopards in Khapar area An atmosphere of fear among the villagers cow was attacked mauled by a leopard nandurbar news)

खापर येथील श्री महावीर गोशाळेतील गाय गोशाळेतील छावणीत बांधली होती. शनिवारी (ता. २१) रात्री बिबट्याने तिच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर गाय खाली पडल्याने बिबट्याने तिला फस्त केले.

त्या वेळी सोबत असलेल्या वासरालादेखील गंभीर जखमी केले. सायंकाळी गोशाळेतील कर्मचाऱ्यांनी गाय जमिनीवर मृतावस्थेत पाहिली. परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसून आले. ही घटना परिसरात पसरल्यावर ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली.

परिसरात काही महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त वावर असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. अनेक वेळा खापर, कोराई येथील नागरिकांनी बिबट्याला पाहिले आहे. बिबट्याने कोराई येथील अनेक जनावरांसह शेळीवर हल्ला करून फस्त केले आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

विशेषतः कोराई गावातील किनारपट्टीवर असणाऱ्या घराबाहेरील अंगणातून बिबट्याने जनावरांना नेल्याची घटनादेखील घडली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात पाहणी करून बिबट्या असल्याची खात्री करून पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. बिबट्याने अन्य परिसरात स्थलांतर केले असावे या अंदाजाने वन विभागाने उदासीनता दाखवून प्रयत्न सोडले होते.

जेरबंद करा

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात, तसेच अक्कलकुवा, खापर, वाण्याविहीर व परिसरात ऊस व मक्याची शेती मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे गरजेप्रमाणे स्थलांतर करीत असावा, असा नागरिकांचा अंदाज आहे. अनेक वेळा रायसिंगपूर, कोराई, ब्राह्मणगाव, कौली येथील शेतकऱ्यांना उसाच्या शेतात याचा संचार असल्याचे दिसून आले आहे.

बिबट्याच्या संचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने याकरिता खापर गोशाळेतील परिसरात दोन कॅमेरे लावले असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करून नागरिकांमधील भीती दूर करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT