Fuel supply now smooth in Dhule district dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळे जिल्ह्यात आता सुरळीत इंधनपुरवठा

जिल्ह्यात धुळ्यासह, शिरपूर, साक्री, शिंदखेडा असे चार तालुके मिळून सुमारे ३५० पेट्रोलपंप

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यात धुळ्यासह, शिरपूर, साक्री, शिंदखेडा असे चार तालुके मिळून सुमारे ३५० पेट्रोलपंप आहेत.

जिल्ह्यातील चार राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने रोज पेट्रोल आणि डिझेलची मागणी जास्त आहे.(Fuel supply now smooth in Dhule district dhule news)

हिट ॲन्ड रन, मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रकचालक, मालक यांनी पुकारलेला संप मागे घेतल्यानंतर ३ जानेवारीला जिल्ह्यात पेट्रोलचे ५० टँकर आले. इंधनाचा पुरवठा आता सुरळीत सुरू आहे. त्यामुळे सर्व पंपांवर पेट्रोल आणि डिझेल उपब्लध झाले आहे, असे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

ट्रकचालक, मालकांच्या संपामुळे जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची आकस्मिक टंचाई निर्माण झाली. शहरातील ज्या पंपावर पेट्रोल उपलब्ध होते, त्या ठिकाणी वाहनचालकांच्या रांगा लागल्या. पेट्रोलसाठी शहरातील वाहनचालकांना एका पेट्रोलपंपावरून दुसऱ्या पंपावर धावपळ करावी लागली.

अनेक ग्राहकांनी तर संप बेमुदत असल्याच्या भीतीने गाडीची टाकीच फूल केली. तर काहींनी पेट्रोलचा अतिरिक्त साठा ठेवला. जिल्ह्यात इंधनचा आता सुरळीत पुरवठा होत आहे. शहरासह जिल्ह्यातील जवळपास सर्व पंपांवर पेट्रोल आणि डिझेल उपब्लध असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT