Jalgaon Crime News sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News: LCB पथकावर जुगारींचा हल्ला; 5 पोलिस जखमी

सकाळ वृत्तसेवा

धुळे : कारवाईसाठी गेलेल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पोलिस कर्मचारी पथकावर जुगारींनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता. १९) रात्री वरखेडे (ता. धुळे) येथे घडली.

या हल्ल्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले. नंतर पोलिसांनी रात्रीतूनच हल्लेखोरांची धरपकड सुरु केली. पोलिसांनी आतापर्यंत १९ संशयितांना अटक केली आहे. संशयित चौघे फरार आहेत. त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

वरखेडे (ता. धुळे) गावात श्री बहिरम महाराज यात्रोत्सव सुरू आहे. ग्रामीण भागात यात्रेनिमित्त जुगारींचा वेगळाच उत्सव असतो. वरखेडेत बहिरम महाराज मंदिरापासून जवळच एका घरामागे पत्त्याचा डाव रंगला असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली.

त्यानुसार एलसीबीचे पथक कारवाईसाठी रविवारी (ता. १९) रात्री नऊच्या सुमारास वरखेडे येथे धडकले. ज्या ठिकाणी झन्ना मन्ना जुगाराचा डाव रंगला, तेथे पोलिसांनी कारवाईला सुरवात केली. मात्र, डाव रंगलेला असताना पोलिस आल्याने जुगारी संतप्त झाले. त्यांनी एलसीबीच्या पथकावरच हल्ला केला. एलसीबीच्या पोलिसांना मारहाण केली.

अनपेक्षित झालेल्या या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली. जुगारींनी केलेल्या हल्ल्यात एलसीबीचे योगेश ठाकूर, मयूर पाटील, तुषार पारधी, जगदीश सूर्यवंशी व योगेश साळवे, असे पाच कर्मचारी जखमी झाले. मारहाणीनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणी योगेश ठाकूर यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार संशयित विलास राजेंद्र मराठे, लक्ष्मण लोटन पाटील, सुधीर दिगंबर धनगर, विपुल राजेंद्र पाटील, राकेश लोटन पवार, नितीन ऊर्फ सोनू शिवाजी पवार, जयेश अनिल पाटील, नंदू युवराज पाटील, अविनाश शंकर घुमटकर, सागर अरुण पाटील, कैलास प्रदीप पाटील, दिलीप लोटन शिंदे, मयूर अरुण भदाणे, राकेश कैलास पाटील, सागर एकनाथ पाटील, पंडित सुखदेव पाटील, मच्छिंद्र नवनीत मराठे, वाल्मीक भीमराव पाटील, अमोल ऊर्फ गोपाल निवृत्ती चव्हाण, संदीप ऊर्फ पप्पू राजेंद्र पाटील, रोहित ऊर्फ मोन्या सत्यजित पटेल, विक्की बाबू घुमटकर, शिवाजी यशवंत माळी (सर्व रा. वरखेडे, ता. धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT