Assistant Inspector Jayesh Khalane and colleagues while seizing ganja. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : बुडकीविहीरला शेतातून साडेनऊ क्विंटल गांजा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : बुडकीविहीर (ता. शिरपूर) येथील गांजाच्या शेतात कारवाई करून सांगवी पोलिसांनी साडेनऊ क्विंटल ओला गांजा जप्त केला. बुधवारी (ता. ११) दुपारी ही कारवाई करण्यात आली.

जप्त गांजाची एकूण किंमत ३३ लाख ५५ हजार रुपये आहे.( ganja seized from farm dhule crime news )

गांजाची लागवड करणारा शेतमालक फरारी झाला असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बुडकीविहीर येथे शेतात गांजाची झाडे लावल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांना मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांसह बुधवारी दुपारी शेत गाठले.

शेतमालक जागेवर नसल्यामुळे तेथील पोलिसपाटील सुनील पावरा यांना बोलावून चौकशी केली असता गांजाची लागवड केलेले शेत विठ्ठल बारक्या पावरा (रा. बुडकीविहीर) याच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली.

शेतात पाच ते सहा फूट वाढलेली गांजाची झाडे आढळली. पोलिसांनी झाडे उपटून जप्त केली. त्यांचे वजन ९३० किलो भरले. या मुद्देमालाची किंमत ३३ लाख ५५ हजार रुपये आहे. हवालदार सुनील पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित विठ्ठल पावरा याच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयित फरारी असून, त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक संदीप पाटील, कृष्णा पाटील, मंगला पवार, हवालदार चत्तरसिंग खसावद, आरिफ पठाण, शेखर बागूल, रोहिदास पावरा, राजेश्वर कुवर, जयेश मोरे, योगेश मोरे, शिवाजी वसावे, कृष्णा पावरा, अल्ताफ मिर्झा, मनोज पाटील यांनी ही कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT