Women farm laborers harvesting gwari. In the second photo, young farmer Kailas Borse is packing gawar. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture News : कोणताही असो वार बाजारात भाव खातेय गवार!

सकाळ वृत्तसेवा

कापडणे (जि. धुळे) : उन्हाळा सुरू झाला म्हणजे विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी कमी होण्यास प्रारंभ होतो. बागायत कमी होते. भाजीपाला लागवड व काढणीचा खर्चही निघेनासा होतो. चाळीस अंशांपेक्षा अधिक तापमान गेल्याने भाजीपाला पीक करपायला सुरवात होते.

अशा प्रतिकूल परिस्थितीतही येथील शेतकरी भाजीपाल्याची शेती करण्यात माहीर आहेत. सध्या गवार निघू लागली आहे. गवारीला बाजारात प्रतिकिलो साठचा भाव मिळत आहे. पुढे ऐंशीपेक्षा अधिक भाव गाठेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. शहादा, इंदूर, मालेगाव व सुरतच्या बाजारात गवार चांगलीच भाव खात आहे. (gawar vegetable prices increase in market Dhule Agriculture News)

उन्हाळ्यात पालेभाज्यांची लागवड करणे, उबविणे, पाणी पुरविणे आदींसाठी मोठी मेहनत करावी लागते. कापडणे परिसरातील धनूर, तामसवाडी, हेंकळवाडी, न्याहळोद, बिलाडी, धमाणे, देवभाने शिवारात गवार लागवडीस अधिक प्राधान्य देत आहेत.

या वर्षी गवारीचे क्षेत्र अधिक वाढले आहे. गवारीला मालेगाव, शहादा व सुरतच्या बाजारात अधिक मागणी असते. बहुतेक शेतकरी वाशी बाजारातही थेट पाठवितात. मार्चमध्ये गवार चांगल्यापैकी निघू लागली आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

गवारीचे भाव वाढतील

गवारीला मार्चमध्येच प्रतिकिलो साठचा भाव मिळत आहे. पुढे तो ऐंशीपेक्षा अधिक जाईल, असे अनुभवी शेतकरी सांगताहेत. गेल्या वर्षी नव्वदपर्यंत गवार पोचली होती, असे गवार उत्पादक चेतन मोरे यांनी सांगितले. गवारीचा काढणी खर्च अधिक आहे. मजूर मिळत नाहीत. भरउन्हात काढणीस महिला मजूर धजत नाहीत, असे उत्पादक कैलास बोरसे यांनी सांगितले.

गवारीचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन

येथील युवा शेतकरी कैलास बोरसे शेतात विविध प्रयोग करीत असतात. कमी खर्चात अधिक उत्पादन काढण्याचा त्यांचा कल असतो. या वर्षी गवारीचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचे सांगितले. अधिक उत्पादनासाठी भाजीपाल्याची विशेष काळजी घेतात. काढणी पॅकिंगही शास्त्रशुद्ध असते. अधिक वेळ शेतीत गुंतलेले असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT