Inspector along with the seized material. S. Agarkar and Associates.
Inspector along with the seized material. S. Agarkar and Associates.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : शिरपूरला रक्षकच निघाला चोर...

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : बांधकाम सुरू असलेल्या घरावर नेमलेल्या रक्षकानेच साथीदारांच्या मदतीने साहित्याची चोरी केली. मात्र पोलिसांनी शिताफीने छडा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (guard assigned to house under construction stole materials with help of his accomplices dhule crime news)

शहरातील रथगल्ली येथील रहिवासी अनिल खंडूसिंह राजपूत यांचे शहराजवळ आमोदा येथे नव्या घराचे बांधकाम सुरू आहे. १२ ते १३ एप्रिलदरम्यान अज्ञात संशयितांनी तेथील शेडचे पत्रे उचकटून लोखंडी सळ्या, सळई कापण्याचे यंत्र व एक गॅस सिलिंडर असा ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, गुन्ह्याचा तपास करताना निरीक्षक ए. एस. आगरकर यांना राजपूत यांच्या बांधकामावर वॉचमनचा संशय आला. त्यांनी संशयित अविनाश सुरेश मालचे (रा. आमोदे) याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्याने साथीदार पंकज मंगल भिल याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेला मुद्देमाल व चोरीत वापरलेला टेम्पो असा एकूण तीन लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयितांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

धुळ्याच्या चोरट्यांना अटक

दुचाकी चोरीच्या संशयावरून शहर पोलिसांनी मोहम्मद सुदास सलीम अन्सारी (वय २१, रा. अराफात चौक, धुळे) व शोएब अलीम मलक (२८, रा. वडजाई रोड, धुळे) यांना अटक केली. त्यांच्याकडून अनुक्रमे तालुक्यातील थाळनेर व मांडळ येथून चोरलेल्या ४० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. एस. आगरकर, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, गणेश कुटे, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, बालमुकुंद दुसाने, पोलिस नाईक मनोज पाटील, पंकज पाटील, रवींद्र आखडमल, अनिल जाधव, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, प्रवीण गोसावी, सचिन वाघ, भटू साळुंखे, आरिफ तडवी, विलास कोळी, विवेकानंद जाधव आदींनी ही कामगिरी बजावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT