Nandurbar News : ज्या आजारावर जनजागृतीसाठी सोडून जगात कुठलाही इलाज नाही त्यातील सिकलसेल हा एक आजार आहे.
राज्यात त्याची रुग्णसंख्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने सिकलसेल स्कॅनिंग लॅब जिल्हा, राज्य आणि देशात राबविला जाणारा पहिलाच प्रयोग असून, त्यामुळे एकाच वेळी दोन लाख लोकांचे सिकलसेलसाठी होणारे स्कॅनिंग हा प्रयोग संपूर्ण देशासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वास मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापनमंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला.(Guardian Minister Anil Patil statement of 2 lakh citizens will be scanned nandurbar news)
पुण्याच्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सिकलसेल स्कॅनिंग लॅबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचे लेफ्टनंट जनरल डॉ. नरेंद्र कोतवाल, ब्रिगेडियर डॉ. मुथ्थुकृष्णन, कर्नल डॉ. उदय वाघ, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी व नागरिक व वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब घटकांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान योजनेतून सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्वातंत्र्यानंतर गरिबांच्या आरोग्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीही विचार केला गेला नाही. त्यातल्या त्यात सिकलसेल लॅबसाठी नंदुरबारला प्राधान्य
दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानत ते म्हणाले, की पूर्वी सिकलसेलचे सॅम्पल घेतल्यानंतर रिपोर्टसाठी मुंबई किंवा पुणे येथे पाठविले जात. ते रिपोर्ट प्राप्त होण्यासाठी सुमारे आठ दिवसांचा कालावधी जात असे, तोपर्यंत त्या रुग्णावर कोणते इलाज करायचे यावर ठोस निर्णय घेता येत नव्हता; परंतु आता या लॅबच्या माध्यमातून तत्काळ रिपोर्ट प्राप्त करून सिकलसेल पॉझिटिव्ह रुग्णावर कोणती काळजी घ्यावी याची दिशा निश्चित करता येणार आहे.
या उपक्रमासाठी रुग्णाच्या स्कॅनिंगसाठी प्रत्येकी १८० रुपये इतका खर्च अपेक्षित असून, त्यासाठी व या लॅबच्या आनुषंगिक साधनसामग्रीसाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून, मदत, पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या राज्याच्या निधीतून काही तरतूद करता येत असेल तर ती निश्चितच केली जाईल.
त्याचबरोबर जनआरोग्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या पुनर्विनियोजनातून जे काही करता येईल ते करण्यासाठी वचनबद्ध आहे. शासकीय वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, अधिकारी भाग्यवान आहेत, त्यांना आपल्या उपजीविकेच्या माध्यमातून सर्वसामान्य, गरीब जनतेची आरोग्यसेवा करण्याची संधी
लाभली आहे. सिकलसेलवर केवळ जनजागृती हाच फक्त इलाज असून, त्यासाठी स्थानिक बोलीभाषेतील लोककलेतून जनजागृती करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनातून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या सिकलसेल स्कॅनिंगचा खर्च आदिवासी विकास विभाग करणार डॉ. विजयकुमार गावित यांची माहिती
आर्म फोर्स वैद्यकीय महाविद्यालयामार्फत लोन बेसिस सुरू करण्यात आलेली ही लॅब काही कालावधीत सुमारे दोन लाख लोकांचे स्कॅनिंग करणार आहे. एका दिवसाला ११ हजार नागरिकांचे स्कॅनिंग केले जाणार आहे; परंतु तेवढ्यावरच न थांबता जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे स्कॅनिंग केल्यास त्यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी आदिवासी विभागामार्फत उचलण्यात येईल.
तसेच अशा प्रकारची लॅब कायमस्वरूपी जिल्ह्यात उभारण्यासाठी जे काही सहकार्य जिल्हा प्रशासनास लागेल ते सर्वतोपरी आदिवासी विकास विभागाकडून करण्याचा विश्वास आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिला.
जिल्हा रुग्णालयातील सिकलसेल तपासणी अत्याधुनिक यंत्र व लॅबचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की वैद्यकीय, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या लॅबचे कामकाज व तंत्र शिकता येणार आहे. सिकलसेल या आजारावर जनजागृतीसाठी पुढील दिशा आणि या आजाराची आनुवंशिकता रोखण्यास शासन व प्रशासनास निश्चितच यश प्राप्त होणार आहे.
प्रत्येक गाव, पाडा, घर, शाळा, महाविद्यालयांचे सिकलसेल स्कॅनिंग या लॅबच्या माध्यमातून होईल, जिल्ह्यातील नागरिकांच्या आनंदी आणि सुखी, निरोगी जीवनाची नांदीच ही लॅब ठरणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी मनोगत व्यक्त केले. लेफ्टनंट जनरल डॉ. नरेंद्र कोतवाल यांनी प्रास्ताविक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.