Gutkha worth 1 crore seized in Nimdale Shivar dhule crime news
Gutkha worth 1 crore seized in Nimdale Shivar dhule crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : निमडाळे शिवारात सव्वा कोटीचा गुटखा जप्त; हृषीकेश रेड्डींसह पथकाची धडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमडाळे शिवारात सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा शहराचे उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी व त्यांच्या पथकाने निमडाळे शिवारात धडक कारवाईत तब्बल सव्वा कोटी किमतीचा गुटखा (Gutkha) जप्त केला.

या प्रकरणी पाळधी (जि. जळगाव) येथील म्होरक्यासह सात संशयितांना पोलिसांनी अटक केली. (Gutkha worth 1 crore seized in Nimdale Shivar dhule crime news)

पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमडाळे (ता. धुळे) शिवारात राज्यात बंदी असलेला गुटखा दोन आयशर वाहनातून येणार असल्याची माहिती हृषीकेश रेड्डी आणि त्यांच्या पथकाला मिळाली. याआधारे श्री. रेड्डी व पथकाने सोमवारी (ता. २०) रात्री दहापासून निमडाळे शिवारात सापळा रचला.

रात्री साडेअकरानंतर दोन आयशर वाहने (एमएच ०४, एफजे ३०४८, एमएच ०४, एचडी ७३५०) निमडाळे शिवारातून जात असताना पोलिस पथकाने अडविल्या. त्यांची तपासणी पथकाने सुरू केली. यात सुमारे एक कोटी २३ लाखांचा गुटखा, सुगंधित तंबाखू आढळली. हा साठा जप्त करतानाच पोलिस पथकाने संशयित सात जणांना ताब्यात घेतले.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

त्यांच्याविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाकडून झालेल्या पंचनाम्यानंतर गुन्हा दाखल झाला. नंतर गुटखा प्रकरणी भरत सुदाम बाविस्कर (वय ३५), किशोर सुदाम बाविस्कर (४२), राजू जीवराम सोनवणे (५२, तिघे रा. दिनकरनगर, मोहन टॉकीजमागे, जळगाव), अनिल जनार्दन सोनवणे (४५, रा. पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव), श्रीराम राजेंद्र तायडे (३०, रा. तानाजी मालुसरेनगर, जळगाव), ज्ञानेश्‍वर पंढरीनाथ सोनवणे (३५, रा. सुजदे, ता. जळगाव), जागेंद्र भिका पाटील (४०, रा. फुलपाट, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय हुजे, हवालदार कबीर शेख, चंद्रकांत जोशी, रमेश उघडे, मंगा शेमले, प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, कर्नल चौरे, शरद पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

अधीक्षकांचे आवाहन

शहरात गुटख्यासह इतर अवैध व्यवसाय सुरू असतील, तर जनतेने माहिती कळवावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT