harshada desale esakal
उत्तर महाराष्ट्र

Success Story : सायकल कारागिराची मुलगी बनली कृषी विभागाची उपसंचालक!

सकाळ वृत्तसेवा

Success Story : शिंदखेड्यासारख्या ग्रामीण भागात राहूनही कुटुंबात कसलेही शैक्षणिक वातावरण नसतानाही गरिबी आणि शैक्षणिक असुविधांशी दोन हात करत तिने आकाशभरारी घेतली. (harshada desale became Deputy Director of Agriculture Department news)

मेहनत आणि अभ्यास करत राहिली आणि आज ती कृषी विभागाची उपसंचालक झाली. तिच्या भरारीबद्दल तिच्यावर गावासह परिसरातील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मुलीचे हे यश पाहून तिच्या आई-वडिलांना तर आभाळच ठेंगणे झाले. हर्षदा सुनील देसले असे या मुलीचे नाव आहे.

हर्षदाचे मूळ गाव तसे शिंदखेडा तालुक्यातील माळीच. तिचे वडील सुनील राजधर देसले यांचे शिंदखेड्यात सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. अशा परिस्थितीत आर्थिक परिस्थितीशी झगडत हर्षदाने चौथीपर्यंत किसान हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाचवी ते दहावी गर्ल्स हायस्कूलमध्ये, अकरावीचे एमएचएसएस महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यानंतर धुळे येथे कृषी विद्यालयात बी.एस्सी केले. राहुरी विद्यापीठात एमएस्सी पूर्ण करून त्यात सुवर्णपदकही मिळविले.

एम.एस्सी.नंतर बॅंकेची परीक्षा देऊन कॅनरा बँकेमध्ये दहा महिन्यांपासून कृषी अधिकारी म्हणून सेवेत होती. या काळातच तिने एमपीएससी परीक्षा देऊन ती उत्तीर्ण झाली आणि आज तिची निवड कृषी विभागाच्या उपसंचालकपदी झाली. तिच्या या भरारीने ग्रामीण भागातील मुलींसमोर आदर्श निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT