heavy rainfall in taloda nandurbar news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Rain Update : तळोदा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकरीराजा सुखावला

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Rain Update : तळोदा तालुक्यात बुधवारी (ता. १२) सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. शिर्वे, इच्छागव्हाण, रेवानगर, सोरापाडा या भागात पावसाचा जोर अधिक होता. (heavy rainfall in taloda nandurbar news)

शिर्वे व सोरापाडा येथे काही घरांमध्ये पाणी गेले, तर कोठार, पाडळपूर, धनपूर या भागातदेखील पावसाचा जोर होता. दुसरीकडे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर लोभाणी गावाजवळील पुलावरून पाणी वाहत होते.

तालुक्यात बुधवारी पाऊस कोसळधार घेऊन आला होता. सकाळपासून सुरू झालेली कोसळधार दुपारी दोनपर्यंत सुरू होती. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तळोदा शहरातदेखील ठिकठिकाणी तळे साचले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नवीन वसाहतींमध्येदेखील सर्वत्र पाण्याचे तलाव साचले आहेत. त्यामुळे पावसाच्या जोरदार हजेरीने शेतकरीराजा सुखावला आहे.

सातपुड्यात उगम पावणारे तालुक्यातील सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे नळगव्हाण येथील नदीला मोठा पूर आला, तर लोभाणी येथे बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर पुलावरून पाणी वाहत होते.

तालुक्यातील शिर्वे, सोरापाडा या गावांतील काही घरांमध्ये पाणी गेल्याचीदेखील घटना घडली आहे. ग्रामस्थांनी तातडीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते. दरम्यान, नागरिकांनी पूर पाहण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT