alu farming esakal
उत्तर महाराष्ट्र

Success Story : अबब... 6 ते 7 फूट उंचीचे अळू! युवा शेतकरी गुजरातमध्ये करतोय पानांची विक्री

सम्राट महाजन

Nandurbar News : प्रबळ इच्छाशक्ती, प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करून, स्वतःची व पर्यायाने कुटुंबाची प्रगती साधता येते हे तळोद्यातील एका युवा शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. (height of alu leaf in field is about 6 to 7 feet in santosh magare farm nandurbar news)

संतोष मगरे यांनी पारंपरिक शेतीला छेद देत धाडस दाखवीत अळूची शेती फुलविली असून, त्यातून दररोज उत्पन्न घेत आहेत. त्यांच्या शेतातील अळूची उंची चक्क सहा-सात फूट असून, ते या पानांची विक्री नंदुरबार जिल्ह्यासह शेजारील गुजरातमधील अनेक गावांमध्ये करीत आहेत.

त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.संतोष मगरे (वय ४३) यांना लहानपणापासून शेतीची आवड आहे. लहानपणी ते आपल्या वडिलोपार्जित शेतातील मोकळ्या जागेत अळूचे कंद लावून, परिसरातील हॉटेलमध्ये अळूच्या पानांची विक्री करून कुटुंबाला हात भार लावीत होते. कालांतराने वडिलोपार्जित जमीन विकली गेली.

त्यानंतर त्यांनी व मोठे बंधू मुकेश मगरे यांनी संसाराचा गाडा हाकण्यासाठी कॉलेज चौफुलीवर त्यांचा घराच्या जवळच हॉटेल टाकली, तसेच आपल्या घराशेजारी मोकळ्या जागेत अळूचे कंद लावून व्यवसाय सुरूच ठेवला. परिसरातील शेतकऱ्यांकडूनदेखील ते अळूची पाने विकत घेऊन त्यांची विक्री करायचे. दरम्यान, अनुभवावरून त्यांनी अळूची शेती करण्याचा निश्चय केला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

संतोष मगरे यांनी अळूची शेती करण्यासाठी दोन एकर भाड्याची शेती घेतली, मात्र ते क्षेत्र पूर्णपणे कोरडवाहू होते. त्यामुळे त्यांनी सुरवातीला शेतात पाण्यासाठी बोअरवेल केली. तसेच ठिबकची सोय करीत, पेरणीयोग्य जमीन तयार केली. त्यानंतर मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये शेतात हजारोंच्या संख्येने अळूचे कंद लावले आणि अळूच्या कंदांची काळजीपूर्वक निगादेखील राखली.

त्यांच्या मेहनतीला फळ येत तीन महिन्यांनंतर जानेवारीत अळूची पाने विक्रीसाठी निघू लागली. तेव्हापासून अपवाद वगळता दररोज ते अळूच्या पानांची विक्री करीत आहेत. यातून त्यांना हजार ते दोन हजार रुपये मिळत आहेत.

अळूचे अर्थशास्त्र

-अळूच्या पानांच्या एका जुडीची किंमत ४० ते ५० रुपये असून, एका जुडीत ५० अळूची पाने असतात.

-नंदुरबार जिल्ह्यासह शेजारील गुजरातमधील कुकरमुंडा, वेलदा, सागबारा, निझर, रुमकी तलाव, सेलांबा गावांमध्ये पानांची विक्री.

-अळूची व्यवस्थित निघा राखल्यास पुढील पाच-सात वर्षे उत्पन्न मिळत राहील.

मोटारसायकलवरून विक्री

संतोष मगरे अळूच्या पानांची विक्री करण्यासाठी दररोज मोटारसायकलवर जातात. त्यासाठी त्यांनी एक पिंजरा तयार केला असून, तो मोटारसायकलवर व्यवस्थित घट्ट बसेल अशी व्यवस्था केली आहे. पिंजऱ्यात जवळपास ४० जुडी म्हणजेच दोन हजार पाने ठेवता येतात. दररोज ते मोटारसायकलवर दीड ते दोन हजार पानांची विक्री करतात.

"लहानपणापासून अळूच्या पानांची विक्री करीत होतो. अधिक उत्पन्न येण्यासाठी अळूची शेती करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी स्वतः अळूचे कंद तयार करून त्यांची शेतात लागवड केली. परिश्रम घेतल्याने अळूची शेती फुलली असून, अळूची पाने हवी असल्यास ८८०५०५०४९० क्रमांकावर संपर्क साधावा." -संतोष मगरे, युवा शेतकरी, तळोदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT