Household items burnt in the fire.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शॉर्टसर्किटमुळे घराला आग संसारोपयोगी साहित्य जळून खाक

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील जेबापूर रस्त्यावरील सु. माधवनगरमधील भरत कांबळे यांच्या घराला आग लागून नुकसान झाले. शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत घरातील फ्रीज, कपडे, भांडी, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.( House fire due to short circuit dhule news)

जेबापूर रस्त्यालगत सु. माधवनगरमधील अशोक मन्साराम गांगुर्डे यांच्या घरातील वरील मजल्यावरील भाडेकरू भरत कांबळे शनिवारी (ता. २८) रात्री पावणेआठच्या सुमारास बाहेर गेले होते. पत्नी शीतल कांबळे व मुले घरात होती.

त्या वेळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. घरात जवळच अंथरूण-पांघरूण असल्याने आगीने मोठा पेट घेतला. शीतल कांबळे यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांना शीतल कांबळे व मुलांना बाहेर काढत पिंपळनेर पोलिस ठाण्याला माहिती दिली.

माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व पोलिसपथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसपथक व नागरिकांनी मोटर व बादलीच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. आगीत घरातील फ्रीज, कपडे, भांडी, संसारोपयोगी साहित्य खाक झाले. अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. ग्रामसेवक, तलाठी, व पिंपळनेर पोलिस आदींनी पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर; अशक्य वाटणाऱ्या कल्पनेला वास्तवात आणलं...

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मेट्रो डब्यांची संख्या वाढणार, घाटकोपर-वर्सोवादरम्यान सहा डब्यांची ट्रेन धावणार

Japanese Hair Care: जपानी महिलांच्या सिल्की-शायनी केसांचे रहस्य काय? १ रुपयाही खर्च न करता ट्राय करा 'या' ६ सोप्या ट्रिक्स...

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

SCROLL FOR NEXT