dead couple Jitendra Sonawane, Pratiksha Sonawane  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : पत्नीचे दात पाडून, हात मोडून तिला केले ठार मग पतीची आत्महत्या... कुंडाणेमध्ये संशयास्पद घटना

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : कुंडाणे (वेल्हाणे, ता. धुळे) येथे बुधवारी (ता. ६) मध्यरात्रीनंतर पतीने पत्नीचा खून करत नंतर स्वतः आत्महत्या केल्या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात पतीवर गुरुवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल झाला. usband kills wife then suicide dhule crime news)

पतीने जबर मारहाणीतून प्रथम पत्नीचे दात पाडून, हात मोडून तिला ठार केले आणि नंतर त्याने चिठ्ठीत काही कारणे नमूद करून स्वयंपाकघरात स्लॅबच्या कडीला गळफास घेत आत्महत्या केली, अशी कुंडाणेत गंभीर चर्चा आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

घरगुती कारणासह चारित्र्याच्या संशयावरून शेतकरी पती जितेंद्र बालू सोनवणे (वय ३०) याने पत्नी प्रतीक्षा जितेंद्र सोनवणे (वय २५) हिचा खून केल्याचा व नंतर स्वतः आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला. या दांपत्याला तीन वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे मूळ कारण पोलिसांनी शोधावे आणि त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत संशयितांचा शोध घेऊन त्याला अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

आत्महत्येपूर्वी जितेंद्रने मुंबईतील भाऊ गणेश (३५) यास मुलांचा सांभाळ कर, असा मोबाईवर मेसेज पाठविला. तो गणेशने पहाटे पाचनंतर पाहिला. त्याने संपर्कानंतर जितेंद्रच्या मुलीने घडलेली घटना सांगितली. जितेंद्रचे आई-वडील बदलापूर येथे मोठ्या मुलाकडे गेले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मृत जितेंद्रने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी, काही व्हिडिओ क्लिप, मेसेज संशयास्पद असून, त्याची चौकशी करून या दांपत्याच्या आत्महत्या किंवा टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केलेल्या संशयितांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशीही मागणी आहे.

दरम्यान, कुंडाणेत जितेंद्रचे घर सकाळी साडेसहा ते सातपर्यंत बंद असल्यामुळे शेजारच्यांनी आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसपाटलांना माहिती दिली. त्यांच्यासह ग्रामस्थांनी दरवाजा तोडून घरात पाहिले असता सोनवणे दांपत्य गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विजया पवार, हवालदार सुनील जोहरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोनवणे दांपत्याचे मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कैलास श्यामराव पाटील (चिमणपुरी, पिंपळे बुद्रुक, अमळनेर) यांच्या फिर्यादीनुसार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT