Bio- diesel esakal
उत्तर महाराष्ट्र

अवैध बायोडिझेलची जोमाने विक्री; विक्रेत्यांना अभय कोणाचे?

अक्कलकुवा तालुक्यातील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील वाण्याविहीर ते पेचरीदेवदरम्यान बायोडिझेलची अवैध विक्री पुन्हा जोमाने सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

खापर (जि. नंदुरबार) : अक्कलकुवा तालुक्यातील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील वाण्याविहीर ते पेचरीदेवदरम्यान बायोडिझेलची अवैध विक्री पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. वृत्तपत्रांतील बातम्यांनंतर दोन दिवस ‘ड्राय डे’ मनवून पुन्हा बायोडिझेलची दिवसाढवळ्या अवैध विक्री सुरू झाली. महसूल व पोलिस विभागाच्या दुर्लक्षामुळे सर्रास विक्री सुरू झाली आहे. वरकमाईमुळे कर्तव्यही खुंटीला टांगल्याचे चित्र आहे. अवैध बायोडिझेल विक्रीचा विषय तालुक्यात चर्चेत असताना संबंधित अधिकारी कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अवैध बायोडिझेल विक्रीला नेमके अभय कोणाचे, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.

कायदा व सुव्यवस्था फक्त सर्वसामान्यांसाठी असते का? एकेकाळी अक्कलकुवा तालुक्यात कायद्याचे राज्य होते, अपराध्यांना कायद्याचा वचक होता, पण वरकमाईच्या लालसेपोटी अक्कलकुवा तालुक्याला अवैध धंद्याची राजधानी होण्याच्या मार्गावर नेऊन ठेवले आहे. तालुका प्रशासनाची खुली सूट असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांना बळ मिळत आहे.


कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून पेट्रोलपंपाचा व्यवसाय सुरू आहे. पेट्रोल-डिझेलच्या विक्रीमुळे होणाऱ्या व्यवहारात शासनाला मोठ्या प्रमाणात कर मिळतो, पण अक्कलकुवा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध बायोडिझेलच्या विक्रीमुळे येथील पंपचालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामागे अधिकाऱ्यांचे ‘अर्थकारण’ दडल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. काही नागरिकांच्या तक्रारीनंतर अवैध बायोडिझेलचा घोळ वृत्तपत्रांनी चव्हाट्यावर आणला. त्यामुळे हा प्रकार उघड झाला आहे. मात्र तालुका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने या व्यावसायिकांना खुली सूट मिळाली आहे. जिल्हाधिकारी आता लक्ष घालतात का, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT