Milch animal esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : गुरांची अवैध वाहतूक; सव्वासात लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : गुरांची अवैध व निदर्यपणे होणाऱ्या वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाई मोहीम राबविली. त्यानुसार मंगळवारी (ता. ५) दोन वाहनांवर कारवाई झाली. यात १७ गुरांची सुटका केली. सुमारे सव्वासात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. (Illegal traffic of cattle seized 7 lakhs dhule crime news)

सरवड-लामकानी (ता. धुळे) रस्त्यावर मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पेट्रोलिंग करताना सोनगीर पोलिसांना सोनगीरकडून नंदाणेकडे गुरांची निदर्यपणे वाहतूक करणारे पिक-अप (एमएच ०४, डीएच ११५२) वाहन दिसले. पोलिसांनी वाहनचालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहन वेगाने पळविले.

नंतर नंदाणे शिवारात वाहन उभे करून तो पळून गेला. पोलिसांनी तपासणी केली असता सात गोवंशीय जनावरांना दोरीने बांधून कोंबलेले आढळले. कत्तलीच्या उद्देशाने त्यांची वाहतूक केली जात होती. तीन लाखांचे वाहन व ५५ हजारांची सात गुरे असा मुद्देमाल जप्त केला. नितीन जाधव यांच्या फिर्यादीवरून सोनगीर पोलिस ठाण्यात वाहनचालकावर गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुसरी कारवाई मोहाडी पोलिसांनी केली. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास गुरांची अवैध वाहतूक रोखली. चाळीसगाव रोडवरील सावळदे पेट्रोलपंपासमोर पिक-अपला (एमएच १८, ईबी ०९४५) पकडले. चालक वाहन सोडून अंधारात पसार झाला.

वाहनात दहा गुरांना निर्दयपणे कोंबले होते. त्यातील एक गोऱ्हा मृतावस्थेत आढळला. ५९ हजारांची गुरे व तीन लाखांचे वाहन, असा मुद्देमाल जप्त केला. राजेंद्र रोकडे यांच्या फिर्यादीवरून मोहाडी पोलिस ठाण्यात वाहनचालकावर गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehkar Hospital Negligence : मेहकरमध्ये रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर रस्त्यावर प्रसूती; आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत नाकारल्याने संताप

IND vs SL: 'तू वेळ वाया घाववतोय ब्रो...', सर्फराज खानची श्रीलंकन कर्णधाराला स्लेजिंग, Video होतोय Viral

Tribal Students Protest : चर्चा फिस्कटल्याने आदिवासी विद्यार्थ्यांकडून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा; नव्याने दोन अत्यवस्थ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

Marathi News Live Updates : तरुण तेजपाल यांना तीन आठवड्यांच्या आत शरणागती पत्करण्याचे आणि शरणागतीचे प्रमाणपत्र न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश

Jalkot Water Supply : जळकोटचा पाणीप्रश्न सुटणार; ६२ कोटींच्या नवीन जलवाहिनी व नळयोजनेला नगरपंचायतीची मंजुरी

SCROLL FOR NEXT