Death news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : जिल्ह्यात ट्रक अपघातात दोघे ठार

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : भाताचा भुसा भरून जाणाऱ्या ट्रकच्या बॅटरीचा स्फोट होऊन केबिनमध्ये लागलेल्या आगीत होरपळून चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक झाडावर आढळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ४) रात्री मेंढवड (ता. तळोदा) फाट्याजवळ घडली, तर दुसऱ्या घटनेत रनाळे (ता. नंदुरबार) येथे डंपर उलटून झालेल्या अपघातात सहचालकाचा (co-driver) दबून मृत्यू झाला. (in truck accident driver was killed in mendhavad while co-driver died in Ranale nandurbar news)

रायपूर (छतीसगड) येथून भाताचा भुसा भरून ट्रक (जीजे ०३, बीडब्ल्यू ५१३१)चालक दीपसिंह खिमसिंग राव (वय ५५, रा. राजकोट, गुजरात) हे राजकोट येथे जात होते. त्या वेळी मेंढवड (ता. तळोदा) फाट्याजवळ ट्रक गरम होऊन बॅटरीचा स्फोट झाला.

त्यामुळे ट्रकच्या केबिनमध्ये आग लागली. आगीमुळे ट्रकचालक दीपसिंग रावत होरपळला. त्याच्या हाताला चटके लागले. त्यामुळे त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्त्यालगतच्या झाडावर आदळला. त्यात ट्रक रस्त्याचा बाजूला उलटला.

त्यात दबल्याने गंभीर जखमी होऊन दीपसिंग रावत याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत ट्रकमधील भाताचा भुसा जळून खाक झाला होता. याबाबत तळोदा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

दुसरी घटना रनाळे (ता. नंदुरबार) येथे घडली. रनाळेतील बजरंग मंदिर टेकडीजवळून जात असताना डंपर (एमएच ३९, सी २९७७)वरील चालक गणेश देवीदास पटेल याचा भरधाव डंपरवरील ताबा सुटल्याने तो उलटला. त्यात डंपरमध्ये असलेला सहचालक रवींद्र हरी मराठे (५०, रा. रनाळे) याचा दबून मृत्यू झाला.

अपघातानंतर माहिती न देताच गणेश पटेल याने तेथून पलायन केले. याबाबत मनोज राजाराम मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात डंपरचालक गणेश पटेल याच्याविरुद्ध अपघात व रवींद्र मराठे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 World Cup Squad: अजित आगकरने संघ जाहीर केला, तरी १५ जणांमध्ये होऊ शकतो बदल; ICC चा नियम काय सांगतो?

Epstein Files: जेफ्री एपस्टाईनच्या मृत्यूनंतरही ‘काळा इतिहास’ उघड; कागदपत्रे कोण प्रकाशित करत आहे? नेमकी सुत्रे कुणाच्या हाती?

तरुणी नशेत बेधूंद होऊन घरी आली, घरमालकानं पाहिलं अन् मागून येऊन...; पीजी मालकाचं भयंकर कृत्य; पुणे हादरलं

हिंजवडीला मी पुणे समजत नाही.... मराठी अभिनेत्रीचं बिनधास्त वक्तव्य चर्चेत, म्हणते- सॉरी पण मी...

North Maharashtra : उत्तर महाराष्ट्र गारठला! निफाडचा पारा ५.४ अंशांवर; यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT