Let's get to know this river Panjra river included in the campaign.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : चला, जाणू या नदीला अभियानाला मार्चपर्यंत मुदतवाढ; खानदेशातील 13 नद्यांचा समावेश

जगन्नाथ पाटील -सकाळ वृत्तसेवा

Dhule News : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शासन आणि स्वयंसेवी संस्थांतर्फे राज्यात नदी अमृत यात्रा महोत्सव सुरू झाला होता. याद्वारे राज्यभरातील १०८ नद्यांना अमृतवाहिनी बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात खानदेशातील १३ आणि जिल्ह्यातील पांझरा व भात नदीचा समावेश आहे.(Including 13 rivers in Khandesh for river campaign dhule news)

या नद्यांचा अभ्यास करून पुनरुज्जीवन करण्यास गती मिळणार आहे. गेल्या वर्षभरापासून हा कार्यक्रम रखडला आहे. आता राज्य शासनाने ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. येत्या चार महिन्यांत नेमके काय नियोजन होईल याकडे राज्याचे लक्ष राहील. लोकसहभागातून पुनरुज्जीवनाचा डोलारा अवलंबून असल्याचे म्हटले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अमृत यात्रेच्या पहिल्या टप्प्यात नद्यांची सध्याची प्रदूषण स्थिती, वाळूउपसा, अतिक्रमणे, सोडले जाणारे सांडपाणी, पूल व अन्य बांधकामे याच्या नोंदी घेतल्या गेल्या. नदीचे मूळ जलस्रोत व उपक्रम यांचे आराखडे तयार झाले. नदीच्या खोऱ्यातील सर्व गावांत शासनस्तरावर माथा ते पायथा आराखडा तयार केला जात आहे.

या ठिकाणी जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. स्थानिक ग्रामस्थांना सहभागासाठी उद्युक्त केले जात आहे. आजवर पुनरुज्जीवित केलेल्या नद्यांना मॉडेल स्वरूपात समोर ठेवून काम होणार आहे. राज्यभरात चला जाणूया नदीला अभियान सुरू होऊनही ठोस पावले अद्याप उचलली गेलेली नाहीत. वर्षभराची मुदत संपल्यानंतर आणखी चार महिन्यांची मुदत वाढविण्यात आली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यात नदीचा श्वास आणि स्वास्थ्य नेटके राहावे या दृष्टीने राज्यात नदी संवाद यात्रा झाली. मानवी भविष्यावरचे प्रश्नचिन्ह ही बाब लक्षात घेऊन राज्यात नदीचा श्वास आणि स्वास्थ्य नेटके राहावे, या दृष्टीने राज्यात नदी संवाद यात्रा सुरू झाली. नदी विषयाचे महत्त्व मोल याची जनजागृती करण्यासाठी ही यात्रा झाली होती.

नदी पुनरुज्जीवनाची मोहीम पावसाळ्यानंतर गती घेईल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात बारा महिने उलटले. ही यात्रा गुंडाळण्यात जमा होती. आता मुदत दिल्याने, ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

पांझरा, भात नदीचा

चला, जाणू या नदीला अभियानांतर्गत नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिती व उपक्रमास ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ शासन निर्णयान्वये देण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२३-२४ अंतर्गतच्या नावीन्यपूर्ण योजनेतून मंजूर निधीच्या तरतुदीच्या कमाल १० टक्के वाढीव निधीतून केला आहे. खानदेशातील तेरा नद्यांचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यातील पांझरा आणि भात नदीचा समावेश आहे.

खानदेशातील प्रदूषित नद्या

राज्यातील मध्यम प्रदूषित नद्यांमध्ये खानदेशातील तापी, गिरणा, तितूर व रंगावली या चार नद्यांचा समावेश झाला आहे. सर्वसाधारण प्रदूषितमध्ये पांझरा व बुराई यांचा समावेश आहे. कमी प्रदूषितमध्ये बोरीचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT