Mayor Pradeep Karpe, Commissioner Devidas Tekale, Deputy Mayor Anil Nagmote, Municipal Secretary Manoj Wagh were present in the general assembly held on Wednesday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : 74 हजार मालमत्तांवर फडकेल तिरंगा

सकाळ वृत्तसेवा

धुळे : स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत महापालिका क्षेत्रातील ७३ हजार ९४२ मालमत्तांवर तिरंगा फडकविण्याचा निर्धार महापौर प्रदीप कर्पे यांनी महासभेतून व्यक्त केला. शहरातील या स्थितीचे ड्रोनद्वारे चित्रीकरणही होईल. या निर्णयास नगरसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला.

तिरंगा ध्वजाचे धुळेकरांना मोफत वितरण करण्यासाठी महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे महिन्याचे मानधन, तर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय जाहीर केला. (Indian Flag will be hoisted on 74 thousand properties Dhule Latest Marathi news)

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आझादी का अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविला जाणार आहे. यानुसार महापालिकेतर्फे १२ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हा महोत्सव साजरा होईल.

देशभक्तिसाठी प्रेरित या एकाच विषयासाठी राज्यात अशी महासभा घेणारी धुळे महापालिका पहिली ठरल्याचे भाजपचे महापौर प्रदीप कर्पे यांनी सांगितले. महासभेत बुधवारी (ता. ३) या विषयावर सविस्तर चर्चा व नियोजन झाले.

महापौरांसह आयुक्त देविदास टेकाळे, उपमहापौर अनिल नागमोते, नगरसचिव मनोज वाघ व्यासपीठावर होते. नगरसेवक हर्शकुमार रेलन, प्रतिभा चौधरी, नागसेन बोरसे, किरण अहिरराव, सारिका अग्रवाल आदींच्या पत्रानुसार महासभा झाली. नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. याअनुषंगाने महासभेत अनेक निर्णय झाले.

मोफत वाटपासाठी पुढाकार

महापालिकेतर्फे एका तिरंगा ध्वजाची विक्री केली तर ३२ रुपये आकारणी झाली असती. मात्र, धुळेकरांना मोफत ध्वज वितरित होण्यासाठी नगरसेवकांनी महिन्याचे प्रत्येकी पाच हजार मानधन, तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका दिवसाचे वेतन देण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला.

शिवाय नगरसेवक नागसेन बोरसे वैयक्तीक ११ हजार रुपये, तर वंदना भामरे, मुक्तार मन्सूरी, संतोष खताळ, शेख करीम, सद्दाम हुसेन आदींनी प्रत्येकी पाच हजारांची रोख रक्कम महासभेत सुपूर्द केली. धुळेकरांना महापालिका, कमलाबाई शाळा चौक, जयहिंद महाविद्यालय, एसएसव्हीपीएस महाविद्यालय, लोकमान्य हॉस्पिटल आदी ठिकाणी तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप केले जाईल.

प्रभाग क्रमांक १७ चे नगरसेवक तथा स्थायी सभापती शीतल नवले, सुरेखा उगले यांच्या पुढाकाराने साडेपाच हजार घरांवर तिरंगा फडकविण्याच्या खर्चाचा भार उचलल्याची माहिती महासभेत देण्यात आली.

धुळ्यात १२ ला संचलन

शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण होण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी जिवाची आहुती देणाऱ्या देशभक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नगरसेवक अमोल मासुळे यांच्या सूचनेनुसार १२ ऑगस्टला सकाळी सात ते आठ शहरात महापौरांसह महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे बंब, रुग्णवाहिका आदींसह संचलन करण्याचा निर्णय महासभेत झाला.

सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह धुळेकरांना संचलनात सहभागाचे आवाहन महासभेद्वारे झाले.

महापौरांकडून २१ हजाराचा निधी

महापौर प्रदीप कर्पे यांनी महापौरपदाचे महिन्याचे मानधन आणि वैयक्तीक ११ हजार, असा २१ हजारांचा निधी तिरंगा ध्वज मोफत

वाटपासाठी देण्याचा निर्णय घेतला. तसेच शहरात महापालिकेतर्फे १२ ऑगस्टला काढण्यात येणाऱ्या देशभक्तिपर संचलनात माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT