crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : दरोडा प्रकरणी आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद; जिल्हा पोलिसांची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : विसरवाडी (ता. नवापूर) येथील भरत ऊर्फ मुन्ना गणेश अग्रवाल यांच्या घरावरील दरोड्यातील सात आतंरराष्ट्रीय टोळीतील संशयितांना पोलिसांनी काही तासांतच जेरबंद केले.

त्यांच्याकडून दागिने व रोकड हस्तगत करण्यात आली.( international gang jailed in robbery case nandurbar crime news )

भरत अग्रवाल घरात झोपलेले असताना त्यांच्या घरात शुक्रवारी (ता. २०) रात्री दीड ते दोनच्या सुमारास पाच सशस्त्र दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून भरत अग्रवाल, त्यांची पत्नी सोनाली अग्रवाल यांना मारहाण करत सोनल अग्रवाल यांच्या अंगावरील दोन लाख सहा हजार २५० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड जबरदस्तीने काढून घेतली.

बेडरूममध्ये झोपलेली त्यांची मुलगी दिशा हिने प्रसंगावधान राखत गावातील तिच्या काकांमार्फत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गस्तीवर असलेले पोलिस पथक व अग्रवाल यांचे शेजारी असलेल्या प्रिया मोरे व निखिल ठाकरे हे पोलिस दांपत्य मदतीस धावले. चाहुल दरोडेखोरांना याची चाहूल लागताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला.

त्या वेळी दरोडेखोर व पोलिसांमध्ये झटापट होउन दोन दरोडेखोरांना पोलिसांनी जागेवरच पकडले. तीन दरोडेखोर पळून जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. पळून गेलेल्या एकास सुरत रेल्वेस्थानक येथे ताब्यात घेतले. आरोपी नेपाळचे आहेत. अधिक चौकशी केली असता त्यांना गुन्ह्यात मदत करणारे दोन स्थानिक असा एकूण सात जणांना ताब्यात घेतले.

संशयितांकडून दोन लाख सहा हजार २५० रुपयांचे दागिने, रोकड ७० हजारांची तीन मोटारसायकली व ३२ हजार ५०० रुपयांचे सात मोबाईल असा एकूण तीन लाख आठ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ताब्यात घेण्यात आलला स्थानिक योहान जेणू गावित (वय ३८ रा. आंटीपाडा, ता. नवापूर, जि. नंदुरबार) याच्यावर नंदुरबार व धुळे जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.

चक्र मिनराम सुनार ऊर्फ चेतन बहादुर सोनी, हिक्करमल ऊर्फ हिमंत जनक शाही, भरत सोनी, राजू केरे विश्वकर्मा, भाईदास गावित, तुफान ऊर्फ तप्त बहादुरदिनेशसिंग ऊर्फ दिनेश रावत यांना ताब्यात घेतले.

दिशाचे कौतुक

''भरत अग्रवाल यांची कन्या दिशा प्रसंगावधान राखत धैर्याने परिस्थितीला सामोरे गेली. त्याबद्दल तिचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अभिनंदन केले. जिल्हा पोलिस दलातर्फे तिचा सत्कार करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रसंगावधान राखून धैर्याने परिस्थितीला सामोरे जावे व तत्काळ स्थानिक पोलिस, ११२ किंवा नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधावा.''-पी. आर. पाटील, पोलिस अधीक्षक, नंदुरबार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT