Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : थकबाकी भरा, अन्यथा पाणी बंद करू... पाटबंधारे विभागाचा महापालिकेला इशारा!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : मालमत्ता कर, पाणीपट्टीपोटी थकबाकीदारांवर कारवाई करणाऱ्या महापालिकेकडे (Dhule Municipal Corporation) बिगरसिंचन पाणीपट्टीपोटी पाटबंधारे विभागाची तब्बल साडेचार कोटी रुपये थकबाकी आहे. (Irrigation Department warn Municipal Corporation for arrears payment dhule news)

ही थकबाकी भरा अन्यथा नाइलाजास्तव पाणीपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करावी लागेल व उद्‍भवणाऱ्या परिस्थितीस मनपा प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही पाटबंधारे विभागाने दिला आहे. दरम्यान, आपण एक कोटी ८० लाख रुपये अदा केले असून, उर्वरित थकबाकी टप्प्याटप्प्याने भरणार आहोत.

शिवाय वाढीव पाणीपट्टी लावलेली असल्याने ती अदा करताना महासभेची परवानगी घ्यावी लागेल, असे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शहराला विविध जलस्रोतांमधून पाणीपुरवठा होतो. यापोटी पाटबंधारे विभागाकडून बिगरसिंचन पाणीपट्टी आकारली जाते.

महापालिकेकडे नकाणे तलाव, सुलवाडे मध्यम प्रकल्प, हरण्यामाळ तलाव, अक्कलपाडा प्रकल्प या जलस्रोतांमधील पाणीपट्टीपोटी पाटबंधारे विभागाची महापालिकेकडे थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी आयुक्तांना पत्र देत थकबाकी भरा अन्यथा पाणीपुरवठा खंडित करू, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

एक कोटी ८० लाख अदा

२०२१-२२ या वर्षातील मार्च-२०२२ अखेर दोन कोटी ८१ लाख १४ हजार रुपये थकबाकी, २०२२-२३ या वर्षातील एप्रिल-२०२२ ते फेब्रुवारी-२०२३ अखेर एकूण तीन कोटी ५० लाख ७१ हजार रुपये आकारणी असे फेब्रुवारी-२०२३ अखेर एकूण सहा कोटी ३१ लाख ८५ हजार रुपये थकबाकी होती.

त्यांपैकी महापालिकेने २०२२-२३ या वर्षात एक कोटी ८० लाख रुपये भरणा केला आहे. दरम्यान, अद्यापही महापालिकेकडे फेब्रुवारी-२०२३ अखेर एकूण चार कोटी ५१ लाख ८५ हजार रुपये थकबाकी येणे आहे.

...अन्यथा पाणी बंद

थकबाकी भरण्याबाबत आपल्या कार्यालयास पत्रव्यवहार करण्यात आलेला होता; परंतु आपल्या कार्यालयामार्फत एक कोटी ८० लाख एवढा थकीत पाणीपट्टीचा भरणा केलेला आहे. तरी उर्वरित थकबाकीचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे. वरिष्ठ कार्यालयाकडून थकबाकी वसुली करण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार सुरू आहे.

त्यानुसार ही थकबाकी २९ मार्च २०२३ अखेर भरणा न केल्यास शासनाचे नियम व शासन स्तरावरील तगादा यावरून धुळे महापालिकेचा पाणीपुरवठा नाइलाजास्तव खंडित करण्याची कार्यवाही करावी लागेल. त्यामुळे उद्‍भवणाऱ्या परिस्थितीस महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही पाटबंधारे विभागाने दिला आहे.

महासभेत विषय ठेवू

दरम्यान, पाणीपट्टीपोटी पाटबंधारे विभागाला मागील वर्षांच्या तुलनेत जादा रकमेची थकबाकी अदा केली आहे. उर्वरित थकबाकीही टप्प्याटप्प्याने अदा करू. तसेच पाटबंधारे विभागाकडून या वर्षी जास्त दराने पाणीपट्टी आकारण्यात आली आहे.

त्यामुळे हा विषय महासभेत ठेवला जाईल. त्यानंतर थकबाकी अदा करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. थकबाकी अदा करण्याबाबत पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहारही केला आहे, अशी माहिती कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाने दारू प्यायलेला पब करण्यात आला सील; मालकासह मॅनेजरला ४ दिवसांची कोठडी

KKR vs SRH Qualifier 1 Live : केकेआर - हैदराबाद सामन्यात पाऊस करणार खेळ खराब; काय आहे हवामानाचा अंदाज?

Naga Chaitanya: नागा चैतन्य खरेदी केली नवीकोरी पोर्शे; किंमत वाचून डोळे विस्फारतील

Prashant Kishor: लोकसभा निवडणुकीत भाजप विजयी होणार? मोदींच्या हॅट्रिकबद्दल प्रशांत किशोर यांची मोठं भाकित

SCROLL FOR NEXT