"Run for Merit" marathon 
उत्तर महाराष्ट्र

जळगावात "रन फॉर मेरिट' मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव: आरक्षणाची मर्यादा 50 टक्‍क्‍यांपर्यंत असावी, या प्रमुख मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून "सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' ही संघटना जनजागृती करीत असून, त्याचाच भाग म्हणून रविवारी जळगाव शहरातून 
"रन फॉर मेरिट' मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. त्याला विविध स्तरातील प्रतिष्ठितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

"सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' ही संकल्पना गेल्या वर्षभरापासून राबविण्यात येत आहे. आरक्षणामुळे गुणवत्ताच (मेरिट) धोक्‍यात आली आहे. घटनेनुसार आरक्षण 50 टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादित हवे, परंतु त्यापेक्षाही ते वर गेल्यामुळे मेरीटला धोका आहे. त्यासाठी "सेव्ह मेरिट..' ही संघटना कार्यरत आहे. या संघटनेच्या जनजागृतीचा भाग म्हणून रविवारी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये "रन फॉर मेरिट' मॅरेथॉन आयोजित करण्यात 
आली. जळगावी सागरपार्क येथून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. सकाळी सातला डॉ. चंद्रशेखर सिकची, डॉ. दीपक अटल, ऍड. नारायण लाठी, सतीश मित्तल यांच्याहस्ते मॅरेथॉनचे उद्‌घाटन करण्यात आले. मॅरेथॉन काव्यरत्नावली चौक, भाऊंचे उद्यान, महाबळचौक या मार्गाने निघून पुन्हा सागर पार्कवर समारोप झाला. 
या मॅरेथॉनमध्ये सर्व स्तरातील अबालवृद्धांनी सहभागी नोंदविला. महिलांनीही त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. समाजातील उद्योजक, डॉक्‍टर, सीए, वकील, व्यावसायिक तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवरांचा यात सहभाग होता. 

देशात "मेरिट'वर अन्याय 
या मॅरेथॉनदरम्यान मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. आरक्षणाचे प्रमाण वाढल्याने "मेरिट'वर अन्याय होत असून, देशातील बौद्धिक व कौशल्य संपदा देशाबाहेर स्थलांतरित होत आहे. वेळीच हे थांबवले नाही तर पुढे देशात गुणवत्ताप्राप्त लोकच राहणार नाहीत. या समस्येची समाजाने गंभीर दखल घेऊन त्याबाबत जनजागृती करावी, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT