jalgaon bogas doctor arest imege  
उत्तर महाराष्ट्र

टि-शर्ट वरील वाचला मजकूर...अन्‌ सापडला डॉक्‍टर "मुन्नाभाई' 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव: जिल्हा सामान्य रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालयात एम. डी. डॉक्‍टर सांगत रुग्णालयातील वार्डातील 12 वर्षीय तरुणीची तपासणी करुन तिला इंजेक्‍शन देण्याच्या तयारीतील असलेल्या मद्यधुंद तोतया डॉक्‍टर "मुन्नाभाई'ला नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मुकेश चंद्रशेखर कदम (वय 30 रा.) मोहाडी असे तोतया डॉक्‍टरचे नाव आहे. मंगळवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने जिल्हा रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. 

यावल तालुक्‍यातील मनवेल येथील गणेश हरी कोळी यांची मुलगी रंजना हिला आजारी असल्याने ती उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केली होते. डॉक्‍टरांनी तपासणी करुन तिला रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले. महिला वार्ड (क्रमांक 4) येथे रंजना हिच्यावर उपचार सुरु असून. मंगळवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास रुग्णालयात गळ्यात "स्टेथोस्कोप' लटकवुन तीसीतला तरुण वार्डात आला. येताच 
त्याने रुग्णाची तपासणीला सुरुवात केली. वार्डातील सर्वच रुग्णांची तपासणी करुन तो, आजारी रंजना पर्यंत पोचला तीची तपासणीही त्याने करुन टाकली. 

..बापाला शिकवणार का? 
मुलीची तपासणी होत असतांना रंजनाचे वडील तीला जाणवणाऱ्या त्रासाबद्‌दल या "मुन्नाभाई' डॉक्‍टर साहेबांना आदरपुर्वक माहिती देत होते. मात्र, त्यांना या भामट्या डॉक्‍टरंच्या अंगात असलेला पिवळ्या धम्मक रंगाचा टि-शर्ट वर...बापाला शिकवणार का? असं लिहलेल आढळल्याने शंका आल्याने...तुम्ही कोण? आहात अशी विचारणा केली, तर डॉक्‍टरच्या तोंडातून दारुचा भपकाराच आला..या मद्यधुंद भामट्याने, मी एम.डी.डॉक्‍टर असल्याचे बतावणी केली. तपासणी करत असतांनाच मुलीच्या वडीलांना शंका आल्याने त्यांनी वार्डात कार्यरत पारिचारिकेला गाठून या भामट्या बाबत विचारणा केली..तर, परिचारीकेने संबंधित तरुण डॉक्‍टर नसल्याचे सांगताच. वार्डात सर्वांनाच अश्‍चर्याचा धक्का बसला. 

अन्‌ डॉक्‍टर मुन्नाभाईला चोप ! 
तोतया असल्याचा भंडाफोड झाल्याचे लक्षात येतात, संबंधिताने वार्डातून काढता पाय घेत पोबारा केला. यानंतर तरुणीच्या वडीलांसह पारिचारिका, वार्डातील इतर नातेवाईक तसेच खऱ्या डॉक्‍टरांनी तोतयाचा पाठलाग केला. नागरीकांसह जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून झोडपून घेत नंतर रुग्णालयातील पोलिस चौकीतील कर्मचारी सहाय्यक फौजदार किरण पाठक, राहूल घेटेकडे स्वाधीन केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT