viman 
उत्तर महाराष्ट्र

यंत्राच्या दुनीयेत रंगला अन्‌.... भंगार साहित्यातून बनवले फायटर विमान 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील तांबापुरा भागात राहणाऱ्या एका अशिक्षित वेल्डिंग तंत्रज्ञाने अनोख्या सर्जनशीलतेचा नमुना सादर करत भारतीय फायटर विमानाची प्रतिकृती बनवली आहे. या विमानाची बॉडी पत्र्याची असून त्यात या तंत्रज्ञाने ऑटोरिक्षेतील मशिन, बॅटरी बसवून ते सुरूही केले आहे. 

प्रजासत्ताकदिनी लॉन्च केलेले हे विमान सर्वांच्याच कुतूहलाचा विषय बनलेय. तांबापुरा भागात वेल्डिंग काम, रिक्षेचे मेकॅनिक म्हणून कलीम उस्मान काकर यांची ओळख. शिक्षण जेमतेम... अगदी अशिक्षित म्हटले तरी चालेल. मात्र, लहानपणापासूनच यंत्रांच्या दुनियेत काम केले, त्यातच वाढले म्हणून वाहनांच्या यंत्रांशी त्यांचे चांगले नाते आहे. यंत्रांच्या दुनियेत काम करत असल्याने त्यांना त्याबद्दल कमालीचे कुतूहल. त्यातूनच त्यांना विमानाची प्रतिकृती बनविण्याची इच्छा झाली. 

असे बनविले विमान 
भारतीय वायुसेनेतील लढाऊ विमानासारखी प्रतिकृती बनविण्याचे त्यांनी ठरविले, त्यासाठी तशा मॉडेलचा मोबाईलवरून अभ्यास केला. सुरवातीला पुठ्ठा कापून पंखांची आकृती तयार केली. त्याला त्याच आकाराचा पत्रा जोडत नंतर मधली पत्र्याची बॉडीही तयार केली. विमानाचे मुख पत्र्याच्या साहाय्याने परफेक्‍ट होईल, याची काळजी घेतली. केवळ "शो-पीस' नको म्हणून त्यांनी या विमानाच्या बॉडीत मशिन लावण्याचे ठरविले. दोन-तीन वाहनांचे मशिन ट्राय केल्यानंतर तो प्रयोग यशस्वी झाला नाही. अखेरीस रिक्षातील एक मशिन लावत त्याला बॅटरीने जोडले आणि हे फायटर विमान जमिनीवरून धावू लागले. 

नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताकदिनी काकर यांनी तयार केलेल्या या अनोख्या विमान प्रतिकृतीचे अनावरण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी फारुक शेख, विनोद देशमुख, सलीम इनामदार, शफी बागवान आदी उपस्थित होते. त्यांनी या प्रयोगाचे कौतुक केले. 

जळगावातीलच जहांगीर पेंटर यांनी स्कूटरवर तयार केलेली आटाचक्की "थ्री इडियटस्‌' या गाजलेल्या चित्रपटात वापरली आहे, त्यातून प्रेरणा घेत आपण एखादे फायटर विमान, त्याची प्रतिकृती बनवावी, असे ठरवले. आणि तीन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर हे विमान तयार झाले. 
- कलीम उस्मान काकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT