jalgaon muncipal corporation mayer
jalgaon muncipal corporation mayer 
उत्तर महाराष्ट्र

महापौरपदाच्या आरक्षणात चौघींची दावेदारी 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः राज्यातील 27 महापालिकेच्या महापौरपदाची आरक्षणाची सोडत आज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात सोडतमध्ये जळगाव शहर महापालिकेत अडीच वर्षांसाठी महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातून भाजपच्या नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, प्रतिभा कापसे, दीपमाला काळे यांच्यात दावेदारी असून, यांच्यातून एकाची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. 

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर- पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील सर्व महापालिकांची सोडत काढण्यात आली. यावेळी जळगाव महापालिकेकडून महापौर सीमा भोळे, सभागृह 
नेते ललित कोल्हे यांच्यासह राज्यातील इतर महापालिकेचे महापौर, पदाधिकारी तसेच नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव, अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे, कक्ष अधिकारी निकिता पांडे उपस्थित होते. महापौर, सहसचिव श्री. जाधव तसेच महानगरपालिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. विशेषत: प्रवर्गातील महिला आरक्षणाच्या सोडती महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या. 

मार्च 2021 नंतर होणार महापौर 
जळगाव महापालिका निवडणुकीनंतर महिला मागासप्रवर्गात (ओबीसी) महापौर म्हणून सीमा भोळे यांची वर्णी लागली. 18 सप्टेंबर 2018 ते मार्च 2021 पर्यंत महापौरपदाचे महिला मागासप्रवर्ग हे आरक्षण आहे. त्यानंतरच्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सोडतीत निघालेल्या सर्वसाधारण महिलेसाठी हे पद राखीव झाले आहे. 

75 पैकी 41 महिला 
महापालिकेत 75 नगरसेवक असून, यात 34 नगरसेवक तर 41 नगरसेविका आहेत. त्यात सर्वसाधारण प्रवर्गात तब्बल 25 नगरसेविका आहेत. यात भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, प्रतिभा कापसे, दीपमाला काळे, सिंधू कोल्हे, लता भोईटे, ऍड. शुचिता हाडा, गायत्री शिंदे, चेतना चौधरी, प्रतिभा देशमुख, गायत्री राणे, सुरेखा सोनवणे, रंजना अत्तरदे, प्रतिभा पाटील, शिवसेनेच्या जयश्री महाजन, ज्योती तायडे यांच्यासह आणखी काही नगरसेविकांचा समावेश आहे. 

रस्सीखेच होण्याची शक्‍यता 
महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौरपद एका वर्षासाठी देण्याचे भाजपकडून ठरले होते. त्यात महापौरपद सीमा भोळे यांच्याकडे आले. आता एका वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ झाला असून, दुसऱ्या कोणाला महापौरपदाची संधी मिळणार का हा "सस्पेन्स' अद्याप कायम आहे. त्यात आज निघालेल्या सोडतमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलेची सोडत निघाल्याने उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, प्रतिभा कापसे, दीपमाला काळे यांच्यात रस्सीखेच होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT