Old Hamal Omkar Gade while filling potholes in the memorial square esakak
उत्तर महाराष्ट्र

Social Work: वृद्ध हमालाकडून खारीचा वाटा..! तळोद्यात ते लोटगाडीवरून माती आणून बुजवताहेत खड्डे

सकाळ वृत्तसेवा

Social Work : शहरातील स्मारक चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळा सुरू असून, त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने, वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मात्र याकडे लक्ष द्यायला संबंधितांना वेळ नाही. हे बघून शहरातील एक वृद्ध हमाल ते खड्डे बुजविण्यासाठी पुढे आले आहेत.

ते आपल्या लॉरीवर माती आणून स्वतः खड्डे बुजवीत आहेत. त्यांचे हे कार्य शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रशासन, तरुण यांना लाविवणारे आहे, असे बोलले जात आहे. (labor onkar gade fill pits by bringing soil from hawker nandurbar news)

शहरातील मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण म्हणून स्मारक चौक ओळखले जातो. नेहमी गजबजलेल्या स्मारक चौकात रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळा सुरू असून, शहरात पाऊस चांगलीच हजेरी लावत असल्याने त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे.

त्यामुळे खड्ड्यांमधून वाहन गेल्यास पादचारी व इतरांच्या अंगावर पाणी उडून त्यांचे कपडे खराब होण्याचे प्रसंग वाढले आहेत. त्यामुळे बऱ्याचदा संबंधितांमध्ये वादविवाद होण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत.

तसेच खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघातदेखील होत आहेत. या परिस्थितीकडे लक्ष द्यायला कोणाकडेही वेळ नसल्याने शहरातील एक वृद्ध हमाल स्वतःहून खड्डे बुजविण्यासाठी पुढे आले आहेत.

आयुष्यभर शहरात हमालीचे काम करणारे व लोटगाडीवर विविध मालाची वाहतूक करून आपली व पर्यायाने कुटुंबाची उपजीविका भागविणारे ओंकार गाडे यांनी हे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आपल्या लॉरीवर माती आणून ते स्वतः रविवारी (ता. ३०) खड्डे बुजविण्याचे काम करीत होते. याबाबत त्यांना नागरिकांनी विचारले असता त्यांनी सांगितले, की मला कोणीही खड्डे बुजविण्यास सांगितलेले नाही.

मी स्वतःहून खड्डे बुजवीत आहे, जेणेकरून वाहनधारक व पादचाऱ्यांचा त्रास कमी होईल. त्यांचे हे कार्य शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशासन तसेच तरुण यांना लाजविणारे आहे असे बोलले जात आहे.

शहराला कोणी वाली नाही

मागील सहा महिन्यांपासून तळोदा पालिकेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे मागील लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी संपली आहे, असे त्यांना वाटते.

त्यामुळे काही अपवाद वगळता मागील काळातील सत्ताधारी व विरोधक सर्वच जण सध्या शहरातील समस्येकडे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.

त्याचप्रमाणे प्रशासक तथा मुख्याधिकारी असलेल्या सपना वसावा यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी नंदुरबारचे मुख्याधिकारी अमोल बागूल प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता, सध्या शहराला कोणी वाली नसल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT