Kunal Patil while questioning Ramesh Bhadve, a child seriously injured in the leopard attack incident. esaka
उत्तर महाराष्ट्र

Dhule Leopard News : बिबट्याच्या हल्ल्याने वन विभागाची निष्क्रियता समोर; आमदार पाटील यांची घटनास्थळी भेट

सकाळ वृत्तसेवा

Dhule Leopard News : तालुक्यातील मोघण, बोरकुंड, होरपाडा, मांडळ परिसरात नरभक्षक बिबट्याने हैदोस घातला असून, बिबट्याचा वावर असल्याचे वन विभागाला सांगूनही दुर्लक्ष केले, त्यामुळे वन विभागाबद्दल ग्रामस्थ, शेतकऱ्यांमध्ये संताप असून, त्यातून वन विभागाची निष्क्रियता समोर आली आहे. दरम्यान, वनमंत्र्यांना भेटल्यानंतर आमदार कुणाल पाटील यांनी मोघण, बोरकुंड येथील घटनास्थळी भेट दिली.

बिबट्याला जेरबंद करण्यात लवकरच यश मिळेल, असे म्हणत ग्रामस्थांना धीर दिला. मृत बालकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी मोघण येथील रमेश नानसिंग भादवे या बालकाची जिल्हा रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. (Leopard attack exposes Forest Department inaction dhule news)

धुळे तालुक्यातील नंदाळे आणि बोरकुंड येथील दोन बालकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त व्हावा, यासाठी आमदार श्री. पाटील यांनी २६ ऑक्टोबरला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मंत्रालयात भेट घेतली.

या बिबट्याला जेरबंद करा, बेशुद्ध करा व तसे होत नसल्यास ठार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर या भागात पुण्याहून तत्काळ बिबट्याच्या शोधासाठी पथक दाखल झाले. दरम्यान, आमदार श्री. पाटील यांनी शुक्रवारी (ता. २७) घटनास्थळी भेट दिली.

परिसरात १५ सापळे

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोघण, होरपाडा, बोरकुंड परिसरात वनविभागाने सुमारे १५ पिंजरे लावले आहेत. तर पुण्याहून रेस्क्यू पथक दाखल होऊन त्यांनीही तत्काळ सापळा लावला आहे. ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, लवकरच बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळेल अशी, खात्री रेस्क्यू पथकातील स्वयंसेवकांनी दिली.

दिवसा वीजपुरवठा करा

नरभक्षक बिबट्याच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर बोरकुंड, मोघण, मांडळसह बोरी पट्ट्यात पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार श्री. पाटील यांच्याकडे केली. आमदार श्री. पाटील यांनी मोबाईलवर वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्याशी संपर्क साधून कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामस्थांनी रात्रीच्यावेळी घराबाहेर पडू नये, अंगणात झोपू नये, तरुणांनी पहारा देऊन आपले व गावाचे रक्षण करावे, असे आवाहनही आमदार श्री. पाटील यांनी केले.

विभागीय वन अधिकारी राजेंद्र सरगर, वनक्षेत्र अधिकारी भूषण वाघ, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, संचालक साहेबराव खैरनार, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष लहू पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT