crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : खूनप्रकरणी पुतण्याला जन्मठेप; कलमाडीतील घटनेप्रकरणी न्या. बेग यांचा निकाल

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : जिल्हा न्यायालयाने कलमाडी (ता. शिंदखेडा) येथील मुरलीधर धोंडू पाटील खूनप्रकरणी पुतण्या सूर्यकांत अभिमन पाटील यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

कलमाडी शिवारात २३ जुलै २०१५ ला सकाळी साडेआठच्या सुमारास विहिरीत पाण्याची मोटार का बसविली, या कारणावरून वाद झाला. (Life imprisonment for nephew in murder case dhule crime news)

यात दीपचंद महारू पाटील यांच्या शेताजवळ मुरलीधर पाटील पायी शेतात जात असताना मागून त्यांना आरोपी सूर्यकांत पाटील (रा. कलमाडी) याने त्याच्या मोटारसायकलीने धडक दिली. तसेच चाकूने मुरलीधर पाटील यांच्या पोटात वार करत गंभीर दुखापत केली.

नंतर धुळे शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना २९ जुलै २०१५ ला मुरलीधर पाटील यांचा मृत्यू झाला. त्यानुसार नरडाणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.

दोषारोपपत्र दाखल झाल्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जे. जे. बेग यांच्यापुढे कामकाज चालले. सरकार पक्षातर्फे अकरा साक्षीदारांची अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. गणेश वाय. पाटील यांनी साक्ष घेतली.

डॉ. मिलिंद पाटील, डॉ. आर. के. गढरी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी, आरोपीचे काका देवमन व्यंकट पाटील, पोलिस तपास अधिकारी बी. एम. काळे यांचीही साक्ष व ॲड. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला.

विविध पुराव्यांमुळे न्यायालयाने आरोपी सूर्यकांत पाटील याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच दहा हजारांचा दंड व तो न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेचाही आदेश न्या. बेग यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT