Sub Divisional Police Officer Sachin Hire, Police Inspector Dnyaneshwar Vare etc. along with the liquor seized by the police.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime : रायपूरला दीड लाखांचा मद्यसाठा जप्त; नवापूर पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime : रायपूर (ता. नवापूर) शिवारात राहणारे भाविन कोकणी यांच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत चारचाकी वाहनात पोलिसांना १ लाख ४७ हजार ८४० रुपयांची विदेशी मद्य व चार लाखाचे वाहन असा ५ लाख ४७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. संशयित मात्र फरार झाले आहेत. (Liquor stock worth one and a half lakh seized in Raipur nandurbar crime news)

नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने रायपूर (ता. नवापूर) गावातील शिवारात राहणारे भाविन कोकणी यांच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत चारचाकी वाहन (एमएच ०३, झेड ७२७६) उभे दिसले. पोलिसांनी त्या वाहनांची झडती घेतली.

त्यात विदेशी दारू आढळून आले. या चारचाकी वाहनाची किंमत चार लाख, विदेशी दारुची किंमत अंदाजे १लाख ४७हजार ८४०असे एकूण किंमत ५ लाख ४७ हजार ८४० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युवराज परदेशी, विकी वाघ, दिनेश वसुले, प्रशांत खैरनार आदींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT