Correspondent Valiben Mandore while distributing supplementary nutritional food to tuberculosis patients. Neighbor Chetan Mandore and other dignitaries, employees. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: मंडोरे परिवारातर्फे क्षयरुग्णांना पोषण आहार! PM टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत मदत

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत धुळे शहरातील क्षयरुग्णांना महापालिका स्थायी समितीची माजी सभापती तथा विद्यमान नगरसेविका वालीबेन मंडोरे, सामाजिक कार्यकर्ते चेतन मंडोरे यांच्यातर्फे मोफत पोषण आहारवाटप करण्यात आला.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ‘कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेशंट्स’ हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. (Mandore family provides nutrition to tuberculosis patients Assistance under PM TB Free India Mission Dhule News)

या उपक्रमांतर्गत उपचाराखाली असलेल्या व संमती दिलेल्या सर्व क्षयरुग्णांना स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती, उद्योगसमूह, बँका, विविध संस्था आदींच्या माध्यमातून पोषण व इतर आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जाते.

या उपक्रमांत नगरसेविका श्रीमती मंडोरे व सामाजिक कार्यकर्ते चेतन मंडोरे यांनी महापालिका क्षेत्रातील पाच क्षयरुग्णांना पूरक पोषण आहार सहा महिन्यांपर्यंत पुरविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार रुग्णांना पोषण आहारवाटप करण्यात आला.

क्षयरुग्णांना पाच किलो गहू, अर्धा किलो शेंगदाणे, एक किलो गूळ, एक किलो मठ, एक किलो मूग आदी दरमहा पुरवठा केला जाणार आहे.

श्रीमती मंडोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. सामाजिक कार्यकर्ते श्री. मंडोरे, नीलेश रुणवाल, देवेश साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णांना पोषण आहारवाटप करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी शहर क्षयरोग दुरीकरण केंद्रातील प्रीती कुलकर्णी, शशिकांत कुवर, नीलेश जगदाळे, प्रकाश देवरे, अनिल बागूल आदी उपस्थित होते. धुळे महापालिका शहर क्षयरोग अधिकारी डॉ. जे. सी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

दानशूरांना आवाहन

ज्यांना क्षयरुग्णांसाठी पूरक पोषण आहारासाठी मदत करावयाची आहे, त्यांनी शहर क्षयरोग दुरीकरण केंद्र (कृष्णनगर, मोगलाई, साक्री रोड, धुळे) येथे ०२५६२-२७८३२२ संपर्क साधावा.

प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानात सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर वैशाली वराडे, आयुक्त देवीदास टेकाळे, उपायुक्त तथा प्रभारी अतिरिक्त आयुक्त विजय सनेर, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. पाटील आदींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT