crime news sakal
उत्तर महाराष्ट्र

Crime News : तीन महिलांची मंगळपोत लंपास; एसटी बसस्थानकात चोरट्याची हातसफाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरातील मध्यवर्ती एसटी बसस्थानकातून सोमवारी (ता. १५) एकाच बसमध्ये दोन महिलांच्या तर दुसऱ्या एका बसमध्ये एका महिलेची मंगळपोत लंपास झाली. (Mangalpot stolen of three women in busstand dhule crime news)

धुळे- साक्री बसमध्ये चढताना जयश्री शिवाजी निळे (रा. पोलिस लाइन, धुळे) आणि मनीषा भाऊसाहेब भोसले (रा. लोंढे, ता. चाळीसगाव) यांचे मंगळसूत्र चोरट्यांनी खेचून नेले. ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

बसमध्ये जागा मिळाल्यानंतर या महिलांनी मंगळसूत्र कोणी तरी चोरल्याचे लक्षात आले. त्यामुळे आगारातून बस थेट शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आली. तेथे पोलिसांनी प्रवाशांची झडती घेतली. मात्र, हाती काही लागले नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याच सुमारास बसस्थानकात अमळनेर- वापी बसमधून प्रवास करणाऱ्या अश्विनी भुला खैरनार (रा. मोहाडी) या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. तिघा महिलांनी दागिने चोरीची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT