Diesel pumps sakal
उत्तर महाराष्ट्र

डिझेल पंपही उभारला बोगस; वर्षभरापासून कमी दरात विक्री

डिझेल पंपही उभारला बोगस; वर्षभरापासून कमी दरात विक्री

सकाळ डिजिटल टीम

शिरपूर (धुळे) : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Agra highway) वर्षभरापासून बेधडक डिझेल विक्री (Diesel pumps) करणाऱ्या पंपाकडे प्रत्यक्षात कोणताही परवाना नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या बोगस पंपावर सांगवी पोलिसांनी छापा टाकून साडेचार हजार लिटर डिझेल व दोन वाहनांसह सुमारे १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन संशयित मात्र फरारी झाले. (Diesel pumps also bogus; Sales at low prices throughout the year)

दहिवद (ता. शिरपूर) येथील शिरपूर साखर कारखान्याजवळ सर्व्हिस रोडवरील हॉटेल आईसाहेबमागे मोकळ्या जागेत हा बोगस पंप सुरू होता. तेथून बायोडिझेलची सर्रास विक्री सुरू होती. एवढेच नव्हे तर संबंधित पंपचालकाने महामार्गावर डिझेल संपल्याने उभ्या वाहनांसाठी मोबाईल डिझेल पुरवठा सेवा सुरू करून तसे फलकही जागोजागी लावले होते. एका महिंद्र पिकअपमध्ये डिझेल टाकी आणि पंप याद्वारे ही मोबाईल सर्व्हिस सुरू होती. देखाव्यासाठी पंपावर डिझेल मशिनही बसविले होते.

संशयावरून छडा

सांगवी पोलिस ठाण्याचा पदभार नुकताच सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी स्वीकारला. त्यांनी पोलिस ठाण्याच्या अखत्यारीतील पेट्रोल व डिझेल पंपांची माहिती घेतली असता दहिवद येथील बायोडिझेल पंपाने पोलिस ठाण्याकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे दिसून आले. त्यांनी सखोल चौकशी केली असता कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे संबंधित पंपासंदर्भात नोंद नसल्याचे निष्पन्न झाले. शिरसाट यांनी तहसीलदार आबा महाजन यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. पुरवठा विभागामार्फत शहानिशा केल्यावर हा पंप बेकायदा सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे सांगवी पोलिस व पुरवठा विभागाने मंगळवारी छापा टाकून डिझेलसह महिंद्र पिकअप (एमएच ०२, एक्सए ५५७५) व ट्रक (एमएच १८, एए ५०८६) असा सुमारे १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

घटनास्‍थळाची पाहणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंपाची जागा सुरवीन राजपूत (रा. दहिवद) यांच्या मालकीची असून, त्यांनी भाडेकरारावर गुजरातमधील सोलंकी नामक व्यक्तीला दिली आहे. त्याच्याकडे राजपूत यांचा नातलग कालू देखरेखीसाठी कामास आहे. कारवाईची कुणकुण लागताच सोलंकी आणि कालू फरारी झाले. मुद्देमाल जप्त करण्यासह गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, पुरवठा निरीक्षण अधिकारी मायानंद भामरे, हवालदार संजीव जाधव, अनारसिंह चव्हाण, देवरे आदींनी ही कारवाई केली.

कमी दरामुळे चलती

डिझेलचे भाव भडकल्याने त्याचा वाहतूक व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला आहे. त्यामुळे ट्रकचालक या बोगस पंपावर ७० रुपये प्रतिलिटर दराने मिळणाऱ्या बायोडिझेलची खरेदी करून त्यात सामान्य डिझेल मिसळत होते. या भेसळीतून प्रत्येक फेरीत बऱ्यापैकी रक्कम गाठीशी लागत असल्याने काही ट्रकचालक येथून नियमित डिझेल भरत असल्याचे परिसरातील व्यावसायिकांनी सांगितले. मात्र या इंधनाची गुणवत्ता निकृष्ट असून, त्यामुळे इंजिनचे भाग लवकर खराब होत असल्याची माहिती जाणकारांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Vanjari Reservation: मराठा आरक्षणासारखा वंजारी समाजाचा प्रश्न सुटणार का? ST मध्ये असल्याचा महत्त्वाचा पुरावा सापडला

Kolhapur Attack : विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या कोल्हापुरातील सायबर चौकात प्राणघातक हल्ला,पार्टीच्या वादातून मित्रांमध्ये वाद

MLA Rohit Pawar: सर्वसामान्यांना त्रास दिल्यास गय नाही: आमदार रोहित पवार; आपण जनसेवक आहोत विसरु नका, तीन हजार परत करायला लावले

Dermatitis Spread: 'साेलापूर शहरात टिनिया, कॅन्डिडासह त्वचेच्या विकारांत होतेय वाढ'; शहरात अतिवृष्टी, घाण पाणी अन् ओलाव्याचा परिणाम

SCROLL FOR NEXT