mucormycosis
mucormycosis mucormycosis
उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात कोरोनासोबत नव्‍या आजाराचे थैमान; आढळले अडीचशे रूग्‍ण, कोविड उपचारानंतरचा धोका

सकाळ डिजिटल टीम

धुळे : कोरोनावरील उपचारानंतर म्यूकरमायकोसिसचा (mucormycosis) धोका वाढला आहे. या बुरशीजन्य आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २०० ते २५० रुग्ण आढळले आहेत. या आजाराने बाधित रुग्णांच्या संख्येत (after corona new patient) लक्षणीय वाढ होत असल्याने चिंतेची स्थिती आहे. त्यामुळे प्रारंभिक लक्षणे ओळखून लागलीच उपचार करणे गरजेचे ठरते, असे जिल्हा मुख्‍य आरोग्य अधिकारी तथा इंडियन डेन्टल असोसिएशनचे सचिव डॉ. नितीन पाटील यांनी सांगितले. (Treatment of corona increased the risk of mucormycosis)

कोरोनातून बरे झालेल्या आणि मधुमेही, रोगप्रतिकारशक्ती क्षीण असलेल्या रुग्णांच्या जबड्यात या बुरशीजन्य आजाराची लक्षणे आढळत आहेत. कोरोनाग्रस्त रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित असताना कोविड उपचारादरम्यान या बुरशीचे संक्रमण होऊ शकते. नाकातील सायनसपासून संक्रमण सुरू होते. पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, दात, टाळू, डोळा आणि मेंदूपर्यंत पोचते. काही रुग्णांमध्ये डोळा निकामी होतो. प्रसंगी डोळ्यांवरच्या जबड्याचे हाड, दात शस्त्रक्रियेद्वारे काढावे लागतात. अशा रुग्णांमध्ये अर्धांगवायू, तसेच मृत्यूचे प्रमाण ४० ते ६० टक्क्यांपर्यंत आहे. या आजारात यशस्वी शस्त्रक्रियेनंतर पुन्हा संसर्ग होऊ शकतो. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एन्टी-फंगल औषधी सुरू ठेवाव्या लागतात.

दुर्लक्ष करू नका

संक्रमण सुरवातीलाच थांबविले जाऊ शकते. परंतु, प्रारंभिक लक्षणे दुर्लक्षित केली जातात आणि संक्रमण वाढते. या आजाराचे संक्रमण अत्यंत गतीने पंधरा दिवस ते एक महिना या कमी कालावधीत होऊ शकते. ते जबडा, सायनस, नाकाचे हाड, डोळे निकामी करू शकते. कॅन्सरपेक्षाही या आजाराचा प्रसार जलद आहे. यासाठी प्रारंभिक लक्षणे ओळखून तत्काळ इलाज करणे गरजेचे ठरते. नेहमी जाणवणारी डोकेदुखी, अंगात बारीक ताप, गालावर सूज, हिरड्यांमधून पू असलेल्या पुळ्या येणे, डोळ्यांना सूज, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्यावर सूज असलेली त्वचा काळी पडणे, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, वरच्या जबड्यातील दात हलणे, त्यात वेदना, नाकावर अथवा वरच्या जबड्यातील त्वचा काळी पडणे ही लक्षणे आढळतात, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

आजार टाळण्याचे उपाय

कोरोना उपचारादरम्यान, तसेच नंतरसुद्धा निरजंतुक द्रावण/ माउथवॉश याद्वारे गुळण्या करणे. रोगप्रतिकारशक्तीवर्धक बाबींचा आहारामध्ये समावेश करणे. लक्षणे जाणविल्यास दंतचिकित्सालय, कान, नाक, घसातज्ज्ञ, फिजिशियन, कोरोना उपचार केंद्र येथे तपासणी करणे गरजेचे आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतरही घरी मास्क वापरणे, घरात बुरशी वाढते अशी ठिकाणे, धुळीपासून दूर राहणे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू करणे आवश्यक असल्याचेही डॉ. नितीन पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT