residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

दिवसभर बसले विमानात.... सायंकाळी टॅक्‍सीने पुण्यात !

सकाळ वृत्तसेवा


नाशिक- गेल्या महिन्यात सुरू झालेल्या नाशिक-पुणे विमानसेवेला शनिवारी (ता. 16) विमान कंपनीकडून प्रवाशांना पुरेशी माहिती न दिल्याने ब्रेक लागला. पुण्यासाठी बुकिंग केलेल्या प्रवाशांना खासगी टॅक्‍सीने पुण्याला रवाना करण्याची वेळ विमान कंपनीवर आली. 
 

  उडान योजनेंतर्गत अलायन्स एअर विमान कंपनीच्या वतीने 27 ऑक्‍टोबरपासून नाशिक- पुणे विमानसेवा सुरू करण्यात आली. ऑनलाइन बुकिंगद्वारे गेल्या वीस दिवसांत सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हैदराबादवरून सकाळी आठला नाशिक येथील ओझर विमानतळावर दाखल होणाऱ्या विमानासाठी नाशिकमधून 18 प्रवाशांनी बुकिंग केले होते. वेळेत विमान धावपट्टीवर आले. परंतु पुण्याला उड्डाण होत नसल्याने प्रवाशांना ताटकळावे लागले. विमानात हैदराबाद येथील सात प्रवासी होते. पुणे येथील संरक्षण विभागाच्या अखत्यारित असलेले लोहगाव विमानतळावर दर शनिवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाचदरम्यान मेन्टेनन्स केला जातो. त्यादरम्यान सर्व विमानसेवा बंद केल्या जातात.

कंपनीकडून प्रवाशांना माहिती देण्यात आली नाही. लोहगाव विमानतळावरून सिग्नल मिळत नसल्याने प्रवाशांनी विचारणा केल्यानंतर वास्तव लक्षात आले. दिवसभर विमानतळ बंद असल्याने उड्डाण होणार नसल्याचे कंपनीकडून कळविण्यात आले. अखेरीस प्रवाशांना खासगी वाहनाने पुण्याकडे रवाना करण्यात आले. सोशल मीडियावर हा केविलवाणा प्रकार संतप्त प्रवाशांनी व्हायरल केल्यानंतर एअर अलायन्स कंपनीवर टीकेची झोड उठली. दरम्यान, प्रवाशांना कंपनीकडून तिकिटाचे पैसे परत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दर शनिवारी पुणे सेवा बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

नाशिकचे चित्रही वेगळे नाही... 
लोकांना या सेवेबद्दल मोठी उत्सुकता आहे. सेवा सुरळीत रहावी,यासाठी वेगवेगळ्यास्तरावर प्रयत्न केले जात आहे. जास्तीत जास्त शहरे जोडावी तसेच लोकांनाही चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यावर कंपन्यांचा भर राहिला आहे. मात्र वारंवार अडथळा येत आहे. कुठलीही पुर्व सूचना न देता अचानक फ्लाईट रद्द केले जात असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावर देखील यापेक्षा वेगळे चित्र नसते. तेथेही वेगवेगळ्या कंपन्यांनी आपल्या नव्यानेच सेवा सुरु केल्या आहेत, मात्र या सेवेतील वेळापत्रकातही विस्कळीतपणा दिसून येत आहे. दळणवळणाच्या दृष्टीने नाशिक महत्वाचे शहर आहे. त्यामुळे चांगली सेवा द्या, भले किती पैस घ्या अशी नागरीकांची भावना आहे. मात्र याकडेच कंपन्या दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT