coro
coro 
उत्तर महाराष्ट्र

सलग तिसऱ्या दिवशीही कोरोनाने घेतला बळी 

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : शहरात आज पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्ण सापडले आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून कोरोनाने कहर केल्यामुळे रुग्णांची संख्या आता तेवीस झाली आहे. दरम्यान, आज सापडलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे मयतची संख्या सहा झाली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

गेल्या आठवडाभरापासून शहरात कोरोनाने कहर केला आहे. शहरात समतानगर येथे पहिला रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यानंतर सिंधी कॉलनी, शांतीनगर, आंबेडकर नगर, गंगाराम प्लॉट, पंचशील नगर, महेश नगर, जाम मोहल्ला, खडका रोड, भजी गल्ली, इंदिरानगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, मोमीन पुरा, काझी प्लॉट आदी परिसर कोरोनाने गाठला आहे. रविवारी (ता. १०) मोमीन पुरा व शनी मंदिर वार्ड या दोन भागात दोन रुग्ण सापडले आहे. त्यातील शनी मंदिर वॉर्डातील ६४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या २३ झाली आहे. यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे १७ रुग्णावर उपचार सुरु आहेत. 
 
सिंधी कॉलनीतील रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह 
दरम्यान, सिंधी कॉलनीतील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र सिंधी कॉलनीतील पहिला रुग्ण असलेला त्या व्यक्तीचा तो अहवाल असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT