docter kedkar
docter kedkar 
उत्तर महाराष्ट्र

भुसावळच्या डॉ. केळकर दाम्पत्याच्या हार्मोनिका वादनाची पंतप्रधानांनी घेतली दखल

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ :  येथील डॉक्टर केळकर दाम्पत्याच्या हार्मोनिका वादनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात दखल घेतली  आहे. आपणही सध्याच्या कठिण प्रसंगात एखादा छंद आत्मसात करावा. संगीतातुन मोठा आनंद मिळतो असे मोदी म्हणाले.


भुसावळचे सर्जन डॉ. आशुतोष केळकर व त्यांच्या पत्नी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सुजाता केळकर यांचा हार्मोनिका वादनाचा छंद सर्वांच्या परिचयाचा आहे. दोघांनीही हार्मोनिका वर म्हंटलेली गाणी ते सोशल मिडिया वर शेअर करतात. तर देशभरात होणाऱ्या हार्मोनिका वादनाच्या स्पर्धेतही ते मोठ्या उत्साहात सहभागी होतात. स्वत:च्या हृदयाची बायपास झाल्या नंतर फुफ्फुसाचा व्यायाम करण्यासाठी ते हार्मोनिका शिकले. पुढे त्याचे छंदात रुपांतर झाले. यात पत्नीचीही छान साथ मिळते. सध्या ते दोघेजण कोरोना व्हायरस संदर्भातील जनजागृतीसाठी आपल्या छंदाचा वापर करीत आहे. मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात केळकर दाम्पत्याचा उल्लेख करुन ते म्हणाले संगिता मुळे आनंद व जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.शिवाय अश्या कठिण प्रसंगी स्वत:ला स्वत:शी   तसेच कुटूंबाशी जोडण्याची संधी मिळते.

 
कठिण परिस्थीतीसाठी दोन लाख
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत मदत म्हणून केळकर परिवारातर्फे दोन लाख रुपये देण्याचे डॉ. आशुतोष केळकर यांनी घोषित केले असुन ही रक्कम नेमकी कुठे वापरायला द्यायची याचा निर्णय ते येत्या दोन दिवसात घेणार आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT