farmer bull 
उत्तर महाराष्ट्र

बैलांना पाणी पाजण्यासाठी गाडी थांबविली...घडले भलतेच

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथे बैलांना पाणी पाजण्यासाठी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या किनारी उभी असलेली गाडी बैल बैलांनी प्रकल्पात ओढत नेल्यामुळे एका बैलाचा मृत्यू झाला. तर सुदैवाने शेतकऱ्यांसह महिलेचा जीव वाचला.


कुऱ्हे (पानाचे)  येथील शेतकरी समाधान कालु पाटील हे खंडाळा रोडवरून शेतातून घरी येत असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास लघु पाटबंधारे प्रकल्प वर बैलांना पाणी पाजण्यासाठी गाडी थांबवली.  गाडीला जुंपलेले बैल सोडत असताना बैलांनी अचानक पाण्याकडे ओढ घेतली. त्यामुळे बैलगाडी सरळ प्रकल्पात गेली. यावेळी  बैलगाडीवर एक महिला बसलेली होती . महिलेने आरडाओरड केली.  शेजारील शेतात  उपस्थित असलेले  डॉ. रमाकांत पाटील , बाजीराव पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी  घटनास्थळी धाव  घेतली . व महिलेचे प्राण वाचवण्यात यश मिळवले . मात्र या घटनेत एका बैलाचा मृत्यू झाला. 


गावात बैलगाडी प्रकल्पात गेल्याचे माहिती समजतात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली . मात्र तोपर्यंत  बैलाचा मृत्यू झाला होता . दरम्यान, मृत बैलाचा पंचनामा करण्यात आला . यावेळी सरपंच रामलाल बडगुजर , ग्रामपंचायत  माजी सदस्य सुभाष पाटील , कोतवाल प्रकाश आहिर , पशुवैद्यकीय डॉ. संदीप टोंगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: महाराष्ट्र डेटा सेंटर हबच्या तयारीत! विकास प्रकल्पांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर मोठे बदल! आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू होणार, तिकिटाचे दरही वाढणार; प्रवाशांच्या खिशाला फटका

Navi Mumbai: पिस्तूल, ६ जिवंत काडतुसे अन्..., अपघातग्रस्त कारमधून ९० लाखांचा मुद्देमाल जप्त

कृष्णाईच्या लेकी मालिकेत स्टार प्रवाहची अभिनेत्री मुख्य भूमिकेत, जाणून घ्या संपूर्ण कास्ट आणि प्रसारणाची वेळ

Army Cheeta Helicopter Crashes: लडाखमध्ये मृत्यूला हरवून तीन अधिकारी बचावले! भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले

SCROLL FOR NEXT