chandan robbery
chandan robbery 
उत्तर महाराष्ट्र

वनमजुरच निघाला चंदनचोर

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : गौताळा अभयारण्याचा भाग असलेल्या पाटणादेवी जंगलात वनमजुर म्हणून रोजंदारीवर असलेल्या मजुरानेच जंगलातील चंदनावर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वनविभागाच्या पथकाने संबंधित वनमजुराच्या घरातून 13 किलो 400 ग्रॅम वजनाचे सुगंधी चंदनाचे लाकूड जप्त केले. याप्रकरणी वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे.


पाटणादेवीच्या जंगलात चंदनाची नैसर्गिकरित्या मोठ्याप्रमाणावर उगवण होते. त्यामुळे हे जंगल चंदनासाठी आगार ठरले आहे. यापूर्वी अनेकदा चंदनाची चोरी झाल्याच्या घटना वनविभागाने उघडकीस आणल्या आहेत. शिवाय जंगलातील चंदनाचे रक्षण व्हावे यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना देखील वनविभागाने केल्या आहेत. असे असतानाही चंदनाची चोरी सुरूच आहे.

त्याने केले होते गुन्हे उघड

वनविभागात वनमजुर म्हणून काम करणार्‍या व या जंगलाची खडानखडा माहिती असलेला वनमजुर कैलास नथ्थू चव्हाण हाच चंदनचोर निघेल असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते कारण याच कैलास चव्हाणने वनविभागत घडणारे अनेक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोलाचा सहभाग घेतला होता. त्याच्या या कार्यामुळे त्याला वनविभागासह पोलीस प्रशासनाने देखील गौरविले होते. याच कैलास चव्हाणच्या घरात तीन दिवसांपासून जंगलातील चंदनाच्या झाडांची तोड करून मिळविलेला चंदनाचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एम. डी. चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार कन्नड येथील उपविभागीय वनअधिकारी एस. पी. काळे कन्नडचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शेळके यांच्यासह पथकाने कैलास चव्हाणच्या चंडीकावाडी येथील राहत्या घरात अचानक छापा टाकला. या छाप्यात पथकाला 13 किलो 400 ग्रॅप वजनाचे चंदनाचे लाकूड मिळून आले. या चंदनाची बाजारातील किंमत जवळपास 1 लाख रूपये आहे. वनविभागाने कैलास चव्हाणच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

टोळी असण्याची शक्यता 
जंगलात चंदनाची झाडे कुठे आहे, कोणत्या झाडातुन किती चंदन निघु शकते याची सर्व माहिती कैलास चव्हाणला आहे. त्यामुळे चंदन चोरी करून त्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचा त्याचा अनेक दिवसांपासूनचा हा व्यवसाय असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हे काम एकट्याचे नसल्याने त्याच्यासोबत आणखी कोण कोण सहभागी आहे. याचा तपास होणे गरजेचे आहे. पाटणादेवी जंगलात चंदनाच्या लाकडासह अनेक महत्वाच्या वनौषधी  लाखो रूपये किंमती असलेल्या गारगोटी, नदीपात्रातील वाळू यासह प्रचंड जैविक वनसंपदा नैसर्गिकदृष्टया उपलब्ध आहे.  त्यामुळे कैलास चव्हाण याने चंदनाप्रमाणे इतरही वनसंपदेची चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वनमजुर असलेल्या कैलास चव्हाण या कृत्यामागे कुणाचा हात आहे याचा वनविभागासह पोलीस अधिकार्‍यांनी कसुन तपास करावा अशी मागणी होत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

High Temperature : कोलकातामध्ये पन्नास वर्षातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद; हवामान खात्याने दिली माहिती

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Rinku Singh T20 WC 24 : मिठाई, फटाके अन् सेलिब्रेशन, रिंकूचा फोन आला अन्... वडिलांनी सांगितलं त्या दिवशी काय घडलं

Jitendra Awhad : गुजरातच्या भरभराटासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

SCROLL FOR NEXT