rajesh thombare olw 
उत्तर महाराष्ट्र

Vedio घुबडाला लागलाय चिमुकल्यांचा लळा 

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : लहान मुलांचे रात्रीचे रडणे घुबडाने एकल्यास ते बाळाच्याच आवाजात रडते आणि मुलांना देखील रडवत असल्याचे सांगितले जाते. परंतु, शाळेत आढळून आलेले घुबड पक्षीमित्र राजेश ठोंबरे यांच्या घरी तीन दिवसांपासून असून, या घुबडाला आणि ठोंबरे यांच्या दोन्ही लहान मुलांना एकमेकांचा जणू लळाच लागला आहे. 

जंगली घुबडाचा बच्चा चाळीसगाव शहरातील कन्या शाळेतील एका वर्गात शनिवारी सकाळी मुलींना आढळून आला. त्या मुलींनी शिक्षकांना सांगून त्यांनी पक्षीमित्र राजेश ठोंबरे यांच्याकडे आणून दिला. अगदीच लहान असल्याने त्याला खाण्यासाठी भरवावे लागते. घुबडाचे लहान बच्चा त्यांच्या घरात रुळले आहे. त्याचा सांभाळ ठोंबरे परिवार करत आहे. उडायला लागला की त्याच्या नैसर्गिक अधिवासात ते सोडणार असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. 

मुलांकडे मागते खायला 
तीन दिवसांपासून घुबडाचे बच्चा घरात असल्याने ठोंबरे परिवारातील साऱ्यांना ओळखू लागले आहे. ठोंबरे यांची मुलगी साक्षी आणि मुलगा तक्षक हे आपल्या वडिलांसोबत वेळोवेळी त्या घुबडास खायला देतात. त्यामुळे हे पिल्लू त्यांना चांगलेच ओळखत असून त्यांच्यापुढे सारखे येऊन खायला मागत असते. 

रंगीत घुबडाची प्रजाती 
या घुबडच्या प्रजातीला रंगीत घुबड ( Mottled Wood Owl ) असे म्हणतात. हा शिकारी पक्षी असल्याने उंदीर, पाल, सरडे, नाकतोडे हे त्याचे खाद्य आहे. धारदार आणि बाकदार चोच, अणकुचीदार मोठी नखे आणि अंधारात देखील स्पष्ट दिसण्यासाठी तिक्ष्ण दिव्यदृष्टी ही घुबडाची शस्रे आहे. पंखांची विशिष्ट रचना असल्याने उडताना इतर पक्षांप्रमाणे आवाज येत नाही. त्यामुळे शिकार करतांना भक्ष्याला शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही, की त्याची कधी शिकार झाली. म्हणून घुबडाला सायलेंट किलर अशी उपाधी दिली आहे. रात्री आपल्या अस्तित्वाच्या जाणिवेची आणि जोडीदाराला साद घालण्यासाठी विशिष्ट आवाज काढत असते. त्याला घुत्कार म्हणतात. पूर्ण वाढ झाल्यावर अतिशय सुंदर रंगसंगतीची रचना याच्या पिसांवर दिसते. घाबरवण्यासाठी आपल्या धारदार चोच एकमेकांवर आपटून टॉक टॉक असा आवाज काढतो. निसर्गातील सर्वांग सुंदर आहे हा पक्षी. 



 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

November Planetary Changes: नोव्हेंबरमध्ये ४ ग्रहांची चाल बदलणार! मेष आणि वृश्चिकसह 'या' राशींच्या लोकांना होईल मोठा लाभ

MP Udayanraje Bhosale: फाशीशिवाय दुसरी शिक्षाच नाही : खासदार उदयनराजे भोसले; फलटणप्रकरणी तपास गतीने व्हावा

बापरे! पंजाबी गायक चन्नी नट्टनच्या घरावर गोळीबार! लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी

पतीला प्रेयसीसह रंगेहात पकडलं, संतापलेल्या बायकोनं रस्त्यावरच चपलांनी हाणलं, प्रेयसी लॉजमधून पसार; VIDEO तुफान व्हायरल

खलिस्तानी पन्नूची दिलजीत दोसांजला धमकी; बिग बींच 'या' वादाशी काय आहे कनेक्शन?

SCROLL FOR NEXT