chopda capchar ajgar  
उत्तर महाराष्ट्र

अबब...काय सांगतात.. एकाच दिवशी पकडले की.. सात अजगर !

सकाळवृत्तसेवा

 चोपडा ः चोपडा शिवारात एकाच ठिकाणी पाच, तर खेडीभोकरी शिवारात दोन अजगर आज आढळून आले. अजगर पाहून शेतकरी भयभीत झाले होते. सर्पमित्रांनी त्यांना पकडून शेतकऱ्यांच्या मदतीने जंगलात सोडले. याबाबत  तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली. 

चोपडा येथील अनंत मोतीलाल चौधरी (बस वाहक) यांच्या शेतात आज दुपारी बाराच्या सुमारास एकाच बिळात १२ फूट लांबीचे पाच अजगर, तर खेडीभोकरी- मंगरूळ रस्त्यावरील शिवारातील गट क्रमांक ६८मध्ये अनिल वासुदेव पाटील यांच्या शेतात ६ फूट लांबीचे दोन अजगर आढळून आले. अनिल पाटील यांनी सर्पमित्र सागर बडगुजर व संदीप मालचे यांना पाचारण केले. सर्पमित्रांनी लागलीच इतर शेतकऱ्यांच्या मदतीने अजगर पकडून जंगलात सोडण्यात आले. त्यावेळी चोपडा येथील शेतकरी अनंत मोतीलाल चौधरी यांनीही आपल्या शेतात अजगर असल्याची माहिती मजुरांनी दिली होती. मजूर कामास जाण्यास भीत होते. त्यांनीही सर्पमित्रांना बोलावून एकाच बिळातून पाच अजगर पकडले. अजगरांची लांबी जास्त असल्याने त्यांना पकडण्यात अडचणी येत होत्या. अथक परिश्रम करून सातही अजगरांना पकडण्यात सर्पमित्रांना यश आले.

यावेळी उपवनसंरक्षक अधिकारी व्ही. एच. पवार, वनक्षेत्रपाल पांडुरंग भिका पाटील, वनरक्षक सीमा भालेराव, नाकेदार के. एल. धनगर, किरण पाटील, आय. एम. बुवा यांचे पथकही यावेळी उपस्थित होते. अजगर पकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सातही अजगर सुपूर्द करण्यात येऊन ते जंगलात सोडून देण्यात आले. यावेळी शेतकरी अजय सोनवणे, भय्या महाजन, संतोष महाजन मजूर यांनी सहकार्य केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Heatwave : ब्रह्मपुरी, वर्ध्याचा पारा ४७ अंशांवर; विदर्भात आणखी दोन दिवस रेड अलर्ट, पावसाचं आगमन कधी होणार?

Eye Care Tips : स्क्रीन बघताच डोळे दुखू लागतात? मोबाईल अन् लॅपटॉपमध्ये लपलेल्या 'या' 2 सेटिंग करा सुरू; मिनिटात मिळेल आराम

Vinesh Phogat: खेळाडूंविरुद्ध सूडबुद्धीने वागू नका...!" हायकोर्टाने कुस्ती संघटनेला झापले; विनेश फोगाट प्रकरणात मोठा ट्विस्ट

पुण्यात ‘रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल’चा दिमाखदार शुभारंभ!

BJP MLA: "वर्गात 'येस सर' ऐवजी 'जय श्री राम' म्हणा..." ; भाजप आमदाराच्या वक्तव्यामुळे वाद!

SCROLL FOR NEXT